पुणे

वाढेश्‍वर केसरीचा मानकरी अभिजित भोईर

CD

पिरंगुट, ता. १ : सुतारवाडी (ता. मुळशी) येथील वाढेश्‍वर महाराज उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत माणचा अभिजित भोईर श्री वाढेश्‍वर केसरी किताबाचा मानकरी ठरला. अभिजितने मुठा गावच्या साहिल मोहोळवर विजय मिळवून हा किताब पटकाविला.
मुळशी तालुका कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने पार पडलेल्या या स्पर्धेचे आयोजन सुतारवाडी ग्रामस्थांनी केले होते. वजन गट तीस ते खुल्या गटापर्यंत पार पडलेल्या या स्पर्धेनिमित्त महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके यांची बेमुदत निकाली लढत झाली. अटीतटीच्या या लढतीत सिकंदरने शेळकेवर मात केली. यावेळी झालेल्या पुरस्कृत लढतीत रोहन पवारने जमीर मुलाणीवर विजय प्राप्त केला. स्वप्नील शेलारने सनी केदारीवर विजय प्राप्त केला. दिनेश मालपोटेने शिवराज पायगुडेवर मात केली, तर उमेश निंबाळकरने निखिल मानेवर मात केली.
स्पर्धेचे उद्‍घाटन सुतारवाडी गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेमध्ये दीडशे मल्लांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघांचे अध्यक्ष गोविंद आंग्रे यांनी सहकार्य केले. स्पर्धेचे समालोचन हंगेश्‍वर धायगुडे यांनी तर सूत्रसंचालन संतोष गावडे यांनी केले.

स्पर्धेतील वजनगटनिहाय प्रथम क्रमांक
- ३० ते ३५ किलो - शिवतेज शिंदे (लवळे)
- ४० किलो - आदित्य चव्हाण (कोंढावळे)
- ४५ किलो - ओम केसवड (घोटावडे)
- ५० किलो - आरुष चव्हाण (कोंढावळे)
- ५५ किलो - अथर्व तौर (कुंभेरी)
- ६० किलो - अथर्व गोळे (पिरंगुट)
- ६५ किलो - साहिल देशमुख (भूगाव)
- ७० किलो - पृथ्वीराज सुतार (सुतारवाडी)
- ७४ किलो - वेदांत पवार (पौड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT