Pune-Municipal
Pune-Municipal 
पुणे

युती-आघाडीत उमेदवारीवरून कुरघोड्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला काही दिवसांचा अवधी असतानाच उमेदवारीवरून भाजप- शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीने एकमेकांविरोधात कुरघोड्या सुरू केल्या आहेत.

धानोरी- कळसमधून (प्रभाग क्र. १) भाजपने राष्ट्रवादीच्या ऐश्‍वर्या जाधव यांना उमेदवारी दिली, तर राष्ट्रवादीकडून रेणुका चलवादी यांनी उमेदवारी अर्ज भरला. नव्या गावांतील प्रभागातून (क्र. ४२) युतीकडून अश्‍विनी पोकळे आणि उल्हास शेवाळे यांची उमेदवारी जाहीर झाली. या प्रभागात आघाडीचे उमेदवार निश्‍चित झालेले नाहीत; पण चौघांना एबी फॉर्म असून, त्यात शिवसेनेचे गणेश ढोरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी घेतली.  

फुरसुंगी- लोहगाव या प्रभागातील (क्र. ४२) दोन आणि धानोरी- कळसमधील एका जागेसाठी २३ जूनला मतदान होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत गुरुवारी होती. त्यानुसार युती आणि आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज भरले. अर्ज भरण्यासाठी काही तास राहिले असताना राजकीय पक्षांच्या गोटात वेगवान घडामोडी घडल्या. 

महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेविका किरण जठार यांच्याविरोधात तगडे आव्हान उभे करून राष्ट्रवादीच्या जाधव यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. भाजपने आयत्यावेळी जाधव यांना एमबी फॉर्म दिला. त्यामुळे या प्रभागात जाधव आणि चलवादी यांच्यात लढत होईल. तर, वंचित बहुजन आघाडीतर्फे रोहिणी टेकाळे यांनी अर्ज दाखल केला. 

प्रभाग (क्र. २४) युतीचे पोकळे आणि शिंदे यांनी अर्ज भरले. मात्र, दोन जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आशा बेनकर, भाग्यश्री कामठे, संजय हरपळे आणि ढोरे यांनी अर्ज दाखले केले आहेत. या पक्षाची नेमकी उमेदवारी कोणाला मिळेल, याकडे लक्ष आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत सोमवारी (ता. १०) आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

SCROLL FOR NEXT