Medicine
Medicine 
पुणे

औषधांना आचारसंहितेमुळे ‘डोस’

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - महापालिका रुग्णालयांसह दवाखान्यांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यात प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आणखी महिनाभर औषध खरेदी लांबणीवर गेली आहे. तीन विभागांसाठी सुमारे पाच कोटींच्या औषधे खरेदीची निविदा तयार केली असून, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्याला स्थायी समितीकडून मंजुरी मिळण्यास अडचणी येत आहेत. 

शहरात आठ रुग्णालये व २८ दवाखाने आहेत. रुग्णालयांकरिता दोन वर्षांच्या कालावधीसाठी आवश्‍यक औषधे व साहित्य खरेदीसाठी महापालिकेने ई-निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यानुसार शस्त्रक्रिया विभागासाठी ४१४ प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. एकूण २० निविदा महापालिकेला प्राप्त झाल्या. त्यापैकी पात्र ठरलेल्या १८ निविदाधारकांना हे काम देण्यात येणार आहे. तीन कोटी ७९ लाख ८८ हजार रुपयांचा खर्च महापालिका या खरेदीवर करणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर महापालिकेने तातडीने औषध खरेदी केली, त्यामुळे काही काळ तक्रारी कमी झाल्या होत्या. परंतु, पुन्हा औषध टंचाईच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

याखेरीज सुमारे एक कोटी रुपयांची आयुर्वेदिक औषधे खरेदी केली जाणार आहेत, त्यासाठी महापालिकेला १२ निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी पात्र ठरलेल्या आठ कंपन्यांकडून औषध खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे. दंतरोग विभागासाठी १०७ प्रकारची औषधे व साहित्याचा समावेश होता. तीन निविदा त्यासाठी प्राप्त झाल्या. त्यापैकी १०३ प्रकारची औषधे व साहित्यासाठी महापालिकेला दर प्राप्त झाले. त्यानुसार अडीच लाखांची औषधे व साहित्य दंतरोग विभागासाठी खरेदी केले जाणार आहे.

प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन त्यास मंजुरी मिळविणे आवश्‍यक होते. परंतु, ऐन निवडणुकीच्या तोंडावर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. तसेच, आचारसंहितेत स्थायी समितीच्या सभेपुढे याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला.

आचारसंहितेमुळे स्थायी समितीच्या सभांना ‘ब्रेक’ लागल्याने निवडणूक झाल्यानंतरच मंजुरी व त्यानंतर खरेदीची प्रक्रिया होणार आहे, त्यामुळे महापालिका रुग्णालयांमधील शस्त्रक्रिया विभाग, दंत विभाग आणि आयुर्वेदिक उपचार विभागाला औषधे व साहित्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT