Pune Municipal Corporation Sakal
पुणे

ॲमिनिटी स्पेसला पालिका उत्पन्न मिळवण्याच्या स्रोत म्हणून पाहू शकत नाही

सार्वजनिक सुविधांच्या विकासासाठी राखीव असलेल्या जमिनीकडे महापालिका ही उत्पन्न मिळवण्याचे स्रोत म्हणून पाहू शकत नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सार्वजनिक सुविधांच्या विकासासाठी राखीव असलेल्या जमिनीकडे महापालिका ही उत्पन्न मिळवण्याचे स्रोत म्हणून पाहू शकत नाही, अशी भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

पुण्यातील सार्वजनिक सुविधांच्या विकासासाठी राखीव असलेल्या सर्व जमीन मिळकतीच्या स्थितीबद्दल संपूर्ण खुलासा करण्यात यावा, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

सार्वजनिक सुविधा विकसित करण्यासाठी राखीव असलेल्या जागा खासगी संस्थांना व्यावसायिक अटींवर भाड्याने देण्याऐवजी महापालिकेने त्यांच्या सार्वजनिक सुविधांचा विकास केला पाहिजे. ही बाब महानगरपालिकेचे स्वतःचे घटनात्मक कर्तव्य आहे आणि पुण्याच्या नागरिकांप्रती असलेली एक जबाबदारी आहे. पुणे महानगरपालिका आपली अकार्यक्षमता लपविण्याचा प्रयत्न करत आहे. त्याउलट सार्वजनिक सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनींमधून चुकीच्या पद्धतीने महसूल वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे, असे या याचिकेत नमूद आहे.

कलम ७९ अंतर्गतचे अधिकार हे नियमित विषयासाठी :

महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ च्या कलम ७९ अंतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांच्या आधारे सार्वजनिक सुविधा विकसित करण्यासाठी राखीव असलेल्या जमिनीचे भूभाग व्यावसायिक अटींवर भाडे तत्त्वाने देण्यात येणार आहेत. या अधिकारांना जनहित याचिकेव्दारे आव्हान करण्यात आले आहे. संबंधित अधिनियमाच्या कलम ७९ अंतर्गत असलेले अधिकार हे नियमित विषयासाठी आहेत. सार्वजनिक सुविधा विकसित करण्यासाठी राखीव असलेल्या जमिनीसारख्या विशेष बाबींच्या विल्हेवाटीसाठी हे अधिकार नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

खासगी संस्था सार्वजनिक सुविधांसाठी राखीव जागा व्यावसायिक दराने भाडेपट्टा तत्त्वावर का घेईल आणि नंतर त्यावर सार्वजनिक सुविधा विकसित का करेल? ही योजना तार्किक असल्याचे वाटत नाही. तसेच जर महाराष्ट्र महापालिका कायद्यातील कलम ७९ खालील अधिकार अमर्यादित मानले गेले तर महसूल वाढवण्यासाठी महापालिका पुण्यातील प्रत्येक इंच न इंच जमीन भाडे तत्त्वावर देईल. त्यामुळे कलम ७१ खाली असलेल्या अधिकारांचे स्पष्टीकरण आणि व्याप्तीला याचिकेत आव्हान करण्यात आले आहे.

- ॲड. सत्या मुळे, याचिकाकर्त्याच्या वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT