murder
murder esakal
पुणे

Pune Crime : बहिणीला त्रास दिल्यामुळे मेव्हण्याचा खून तरुणाची आत्महत्या

प्रशांत पाटील

पुणे - बहिणीला त्रास दिल्याच्या कारणावरून एका तरुणाने मेव्हण्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून खून केला. त्यानंतर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बाणेर परिसरात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.

धनंजय पद्माकर साडेकर (वय ३८, रा. श्री समृद्धी अपार्टमेंट, लक्ष्मीनगर, बाणेर) असे खून झालेल्याचे नाव आहे. साडेकरचा खून केल्यानंतर हेमंत रत्नाकर काजळे (वय ४०) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी साडेकरच्या पत्नीने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साडेकरचा हेमंतच्या बहिणीशी विवाह झाला होता.

हे तिघेही एकाच सदनिकेत राहत होते. विवाहानंतर बहिणीला त्रास देत असल्याबाबत हेमंतने साडेकरला जाब विचारला. त्यावरून झालेल्या वादात हेमंतने साडेकरच्या डोक्यात रॉडने वार केला. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे साडेकरचा मृत्यू झाला.

हेमंतने बहिणीला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत माहिती मिळताच पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. साडेकर हा रिक्षा चालवत होता. तर हेमंत खासगी वसतिगृहात व्यवस्थापक असल्याची माहिती चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT