Pune Rain News sakal
पुणे

Pune Rain News : तीन वर्षांपूर्वी हरपले पितृछत्र अन् तिचाही झाला करुण अंत

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील ग्रेड सेपरेटरच्या (समतल विलगक) खड्ड्यात पावसाने भरलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुस्कान शिलावत हिचा (वय १६) करुण अंत झाला. मुस्कानचे मूळ गाव मध्य प्रदेशमध्ये आहे.

सकाळ वृत्तसेवा

कात्रज : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील ग्रेड सेपरेटरच्या (समतल विलगक) खड्ड्यात पावसाने भरलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुस्कान शिलावत हिचा (वय १६) करुण अंत झाला. मुस्कानचे मूळ गाव मध्य प्रदेशमध्ये आहे. मोठा भाऊ, वहिनी व लहान भाऊ यांच्याबरोबर ती राहत होती. वडिलांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. मोठ्या बहिणीला मुलगा झाल्यामुळे आई गावी गेली होती.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील ग्रेड सेपरेटरच्या खड्ड्याजवळ काही कुटुंबे झोपडी करून राहतात. रस्त्यावरच्या खड्ड्यात पावसाने पाणी वाढले. पण तो जास्त खोल नसावा म्हणून मुली तिथे कपडे धुवायला जात होत्या. त्यात पाय घसरून पडल्याने मुस्कानचा दुर्दैवी मृत्यू झाला. ‘‘आम्ही सर्व पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार हिंडत असताना त्या खड्ड्याने घात केला. आम्ही गरीब लोक. आमच्या दररोजच्या जेवणाचा प्रश्न आहे. माझी लेक वाचली; पण खूप प्रेमळ स्वभावाची पुतणी मुस्कान गेली,’’ अशी मुस्कानची चुलती जिजाबाई शिलावत हंबरडा फोडून बोलत होत्या. यावेळी लहान भाऊ गणेश आक्रोश करत होता. संपूर्ण कुटुंब हळहळ व्यक्त करत करत होते.

चाकू-सुरी अशा घरातील वापराच्या वस्तूंना धार लावणे, जुन्या कपड्यांपासून दोऱ्या बनविणे आणि चादरविक्री, अशी कामे करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मध्य प्रदेशातील खारगोन जिल्ह्यातील पाच ते सहा शिलावत कुटुंब कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात गेल्या तीन ते चार वर्षांपासून रस्त्याच्याकडेला पाल उभारून राहत आहेत. दिवसाकाठी शंभर ते दोनशे रुपये रोजगार मिळवून उदरनिर्वाह करतात. मोठा भाऊ व वहिनी चाकू, सुरी वस्तूंना धार लावण्याच्या कामासाठी सकाळी लवकर बाहेर पडतात. स्वयंपाक, धुणी-भांडी व लहान मुलांना सांभाळण्याचे काम मुस्कान करत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली इतिहास घडवणार? सचिन तेंडुलकरला मागे टाकत ३ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

Numerology for Pets: कुत्रा, मांजर, मासे की पक्षी? अंकशास्त्रानुसार पाहा तुमच्या मूलांकासाठी कोणता प्राणी आहे लकी...

Indian Army: पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या भारताच्या ड्रोनवर अमेरिकेची नजर; युद्ध सरावादरम्यान काय घडलं?

दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचा थेट CM Devendra Fadnavis यांना सवाल

कोल्हापुरात मिरवणुकीत तणाव; दोन गट भिडले, लोकांची धावपळ

SCROLL FOR NEXT