wrestler kailas pawar
wrestler kailas pawar sakal
पुणे

Narayangaon News : नामांकित पैलवान कैलास पवार यांचा निर्घृन खून

रवींद्र पाटे

नारायणगाव - पुणे जिल्ह्यातील यात्रा उत्सवामध्ये फड गाजवणारा नामांकित पैलवान कैलास उर्फ पिंटू गुलाब पवार (वय-39, राहणार निमगाव सावा, ता. जुन्नर) या तरुणाचा आज दुपारी मांजरवाडी येथे धारदार शस्त्राने निर्घृन खून करण्यात आला. त्या नंतर आरोपी फरार झाले आहेत.

आरोपींना अटक करण्यासाठी नारायणगाव पोलिसांनी तातडीने कार्यवाही सुरु केली आहे. याबाबत माहिती अशी, गजराबाई सोनबा साळुंके या महिलेचा अंत्यविधी आज सकाळी 11 वाजता सुमारास मांजरवाडी येथे झाला. अंत्यविधीसाठी कैलास पवार हे नातेवाईकांसह उपस्थित होते.

अंत्यविधी झाल्यानंतर कैलास पवार व नातेवाईक असलेले संशयित तीन ते पाच आरोपी हे मांजरवाडी येथील हॉटेलमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास चहापाण्यासाठी थांबले होते. दरम्यान जुन्या भांडणातून कैलास पवार व त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर कैलास पवार हे बाहेर आले. येथील रस्त्यालगत असलेल्या मंदिरासमोरील झाडाजवळ संशयित आरोपींनी कैलास पवार याची छाती, पाठ व खांद्यावर धारदार शास्त्राने वार केले. या हल्ल्यात कैलास पवार हे गंभीर जखमी झाले.

उपचारासाठी त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच ते मृत झाले. यावेळी रुग्णालया बाहेर मोठा जनसमुदाय जमला होता. ग्रामीण रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी भेट देऊन जमावाला शांत केले. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णाला ठेवण्यात आला आहे. रुग्णालयाबाहेर बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक निरीक्षक शेलार करत आहे. संशयित आरोपींची नावे पोलिसांना मिळाली असून आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. गुन्हेगारांना तातडीने अटक करावी. अशी मागणी रमेश पवार यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT