Narendra Dabholkar death anniversay
Narendra Dabholkar death anniversay 
पुणे

Narendra Dabholkar: नरेंद्र दाभोलकरांना विविध कार्यक्रमातून कृतीशील अभिवादन; 800 जणांनी नोंदवला सहभाग

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे (अंनिस) संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाला २० ऑगस्ट २०२३ रोजी दहा वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेच्यावतीनं १५ ते २० ऑगस्टदरम्यान त्यांच्या स्मृतींना कृतीशील अभिवादन करण्यासाठी विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद लाभला. (Narendra Dabholkar 10th death anniversary greetings from various programs 800 people participated)

रक्तदान शिबीराचं आयोजन

स्वातंत्र्यदिनी अर्थात 15 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिवाजीनगर पुणे शाखेने रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं, याला 250 जणांची उपस्थिती होती. तर यावेळी 80 जणांनी रक्तदान केलं. तसेच दाभोलकरांचा ज्या ठिकाणी खून करण्यात आला त्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूलावर १९ ऑगस्ट रोजी स्मृतीजागर करण्यात झाला. या कार्यक्रमाला 200 जण उपस्थित होते. (Latest Marathi News)

मशाल पेटवून स्मृतीजागर करण्यात आला.

दरम्यान, २० ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिराजवळ असलेल्या शिंदे पुलावरून एस. एम. जोशी सभागृहापर्यंत मूकमोर्चा झाला. त्यानंतर सभागृहात विवेक निर्धार मेळावा झाला. या कार्यक्रमाला राज्यभरातून सुमारे दीडशेच्यावर तर पुण्यातूनही तितकेच लोक उपस्थित होते. (Marathi Tajya Batmya)

दाभोलकरांच्या खूनाचे सूत्रधार अद्याप सापडले नसल्यानं निषेध म्हणून शहरात मूक मोर्चाचं आयोजन केलं.

पाच दिवस झालेल्या या कृतीशील कार्यक्रमांमध्ये रक्तदान, स्मृतिजागर, मुकमोर्चा, मेळावा या कृतीशील कार्यक्रमांमध्ये सुमारे 800 जणांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन डॉ. दाभोलकर यांना अभिवादन केलं.

विवेक निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: बंगालमध्ये वाद पेटला, TMC-ISF समर्थकांमध्ये हाणामारी, भाजपचा आरोप- पराभवाच्या भीतीने हिंसाचार

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT