Narendra-Dabholkar
Narendra-Dabholkar 
पुणे

कटात आणखी दोघे

सकाळवृत्तसेवा

पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी गोळ्या झाडून हत्या केली; पण या दोघांना ‘हेच ते दाभोलकर’ हे सांगण्यासाठी जेथे हत्या झाली, त्या ओंकारेश्‍वर पुलावर घटनेच्या अगोदर आणखी दोघे जण येऊन थांबले होते, असा दावा सीबीआयने शनिवारी न्यायालयात केला. यावरून या कटात आणखी दोघे सामील होते, हे स्पष्ट झाले आहे. 

कळसकरची कोठडीची मुदत संपल्याने सीबीआयने त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याच्या कोठडीत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ केली. सीबीआयचे वकील विजयकुमार ढाकणे म्हणाले, ‘‘२० ऑगस्ट २०१३ रोजी शिंदे पुलावर सकाळी सव्वासातच्या आधी दोन जण उपस्थित होते. अंदुरे आणि कळसकरने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडण्याआधी ते डॉ. दाभोलकरच आहेत, अशी खात्री या दोघांकडून करून घेतली. त्यांचा शोध सुरू आहे.’’ बचाव पक्षाचे वकील धर्मराज चंडेल यांनी कोठडीला विरोध केला. 

वैभव राऊत आणि कळसकर यांनी २० जुलै २०१८ रोजी त्यांच्याकडील चार पिस्तुलांची विल्हेवाट लावली. ठाण्यातील कळवा पूल, वसईतील भाईंदर पूल किंवा कल्याण खाडी पूल यापैकी एका ठिकाणी या पिस्तुलांचे तुकडे फेकून दिल्याचे सीबीआयने न्यायालयाला सांगितले. मात्र रात्रीच्या वेळी पिस्तुलाचे तुकडे खाडीच्या पाण्यात फेकून दिल्याने नेमकी जागा कळसकरला आठवत नाही. त्याला प्रत्यक्ष जागांवर पुन्हा नेऊन अधिक तपास करायचा आहे, असे सीबीआयने सांगितले. फेकून दिलेल्या पिस्तुलांपैकी एक पिस्तुल डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरले असावे, असा सीबीआयचा अंदाज आहे.

आरोपींना मारहाणीचा आरोप
दाभोलकर प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या अमोल काळे, राजेश बंगेरा, अमित दिगवेकरची कोठडीत कोल्हापूर एसआयटीने कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येबाबत चौकशी केली. या वेळी मारहाण झाल्याचा आरोप दिगवेकरने न्यायालयात केला होता. अशा प्रकारे कळसकरला पोलिसांकडून मारहाण होऊ नये यासाठी ॲड. चंडेल यांनी न्यायालयात अर्ज करून आरोपीसोबत राहण्याची परवानगी मागितली. मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT