पुणे

संशयित मारेकऱ्यांचे "कर्नाटक कनेक्‍शन' 

सकाळवृत्तसेवा

पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेला दुसरा आरोपी सचिन अंधुरे याला महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याबाबत सीबीआय कसून तपास करीत आहे. अंदुरेचे हे "कर्नाटक कनेक्‍शन' दाभोलकरांच्या हत्येच्या मूळ कटापर्यंत घेऊन जाणारे आहे, असे सीबीआयच्या वकिलांनी रविवारी (ता. 19) सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी अंधुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. 

आज दुपारी कडेकोट बंदोबस्तात अंधुरेला न्यायालयात हजर केल्यानंतर युक्तिवाद करताना सीबीआयचे वकील विजयकुमार ढाकणे म्हणाले, ""अंधुरेला महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याने, या प्रशिक्षणाचे आयोजन नेमके कोण करीत होते? पैसा व साधने यांचा पुरवठा कोण करीत होते, याबाबत सखोल तपास करायचा आहे. विविध ठिकाणांबाबत अंधुरेकडून माहिती घ्यायची आहे. तसेच, कटात वापरलेली दुचाकी व शस्त्रे मिळवण्यासाठी त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, असे न्यायालयाला सांगितले. 

वीरेंद्रसिंह तावडे हा कटाचा मुख्य सूत्रधार असून, त्याचा व अंधुरेच्या संपर्काबाबत, या कटासाठी किती मिटिंग्ज घेतल्या. त्या कधी व कोणत्या ठिकाणी पार पडल्या, हत्येच्या कटात सामील असू शकणारे इतर आरोपी आदी बाबींचा तपास सुरू असल्याचे सीबीआय तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. 

आरोपीचे वकील ऍड. प्रकाश सालसिंगीकर यांनी युक्तिवाद करताना, ""अंधुरेबाबतची ही "थिअरी' सीबीआयने नव्याने बनवली असून, याआधी तपासात त्यांनी सारंग अकोलकर व विनय पवार यांची नावे घेऊन त्यांना फरार घोषित केले आहे. मारेकऱ्यांची रेखाचित्रे म्हणून अकोलकर व पवारची नावे घेण्यात आली. मात्र, आरोपपत्रामध्ये त्यांची नावे नाहीत. यावरून सीबीआयच्या दाव्यात विसंगती असल्याचे स्पष्ट होते,'' असे सांगितले. यावर प्रतिवाद करताना सीबीआयच्या वकिलांनी, ""अकोलकर आणि पवार यांची नावे आरोपपत्रामध्ये नसली, तरी रेखाचित्रामध्ये तयार झालेले चेहरे हे अकोलकर आणि पवार यांच्या चेहऱ्यासारखे दिसतात, हेच दोघे मारेकरी आहेत, असा सीबीआयचा दावा नसला, तरी त्यांचा कटातील भूमिकेबाबत तपास सुरू आहे,'' असे सांगितले. 

महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये आरोपीने शस्त्र प्रशिक्षण घेतल्याने आता अंधुरेचे कर्नाटक कनेक्‍शन तपासाला आणखी दिशा देणारे ठरत आहे, असे सूत्रांनी म्हणले आहे. तसेच, अंधुरेचे सनातन संस्थेशी संबंध असल्याचेही उघड झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT