पुणे

नाट्य परिषदेची निवडणूक ७ ऑक्‍टोबरला

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेची पंचवार्षिक निवडणूक सात ऑक्‍टोबरला होत आहे. यापूर्वी १५ सदस्यांची कार्यकारिणी होती. मात्र, ऑक्‍टोबर २०१७ मध्ये झालेल्या घटना दुरुस्तीनुसार यंदा १९ उमेदवार ही निवडणूक लढविणार आहेत. निवडणुकीसाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ७५ वर्षे असेल,’’ अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिरीषकुमार जानोरीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, प्रमुख कार्यवाह दीपक रेगे उपस्थित होते. जानोरीकर म्हणाले, ‘‘पुणे शहर कार्यकारिणीने केलेल्या ठरावानुसार निवडणूक होत आहे. त्यास परिषदेच्या मध्यवर्ती शाखेने मान्यता दिली आहे. लेखक, कलाकारांना क्रियाशील आजीव सदस्यत्व देण्यात आले आहे, तर रसिक प्रेक्षकांना आजीव सदस्यत्व दिले आहे. मात्र, रसिक प्रेक्षकांना निवडणूक लढविण्याचा अधिकार घटनेनुसार नाही. मान्यताप्राप्त आजीव सदस्यालाच उमेदवारांना सूचक किंवा अनुमोदक म्हणून राहता येईल. निवडणूक १९ जागांवर होत असल्याने, १९ उमेदवारांचे पॅनेलही करता येईल.’’

रेगे म्हणाले, ‘२००८ मध्ये झालेल्या निवडणुकीत साडेआठशे सदस्य होते. २०१३ मध्ये बिनविरोध निवडणूक झाली. यापूर्वी साडेसहाशे रुपये सदस्य नोंदणी रक्कम होती. ती वाढवून १५०० रुपये करण्यात आली आहे. आजमितीस पुणे शाखेचे पंधराशे सदस्य आहेत.’’

१० ते १६ सप्टेंबर - मतदार यादी जाहीर होणार 
१७ ते १९ सप्टेंबर - यादीवर हरकती स्वीकारणार
२० सप्टेंबर - अंतिम मतदार यादी जाहीर  होणार
२५ ते २७ सप्टेंबर - उमेदवारी अर्ज करणे 
२८ सप्टेंबर - छाननी, उमेदवारी यादी जाहीर होणार
२९ ते ३० सप्टेंबर - अर्ज माघारी घेता येणार 
३० सप्टेंबर - अंतिम उमेदवारी यादी जाहीर होणार 
सात ऑक्‍टोबर - मतदानानंतर निकाल जाहीर होणार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT