003Court_Decision_h_8_0_3.jpg
003Court_Decision_h_8_0_3.jpg 
पुणे

नक्षल कनेक्शन : तिघांच्या कोठडीत 19 नोव्हेंबरपर्यंत वाढ

सकाळवृत्तसेवा

पुणे : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटकेत असलेले मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. अरुण फरेरा, वेरनॉन गोंसालवीस, अॅड. सुधा भारद्वाज यांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना आज (मंगळवार) न्यायालयात हजर केले असता त्यांना 19 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

यावेळी एसीपी डॉ. शिवाजी पवार यांनी पोलिस कोठडीत असताना 4 नोव्हेंबरला मारहाण केल्याचा आरोप आरोपी अॅड. अरुण फरेरा यांनी न्यायालयात केला. उजव्या डोळ्याखाली मारहाण झाल्याचे फरेरा यांनी न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांना दाखवले. एसीपी पवार यांनी आपला चष्मा तोडल्याचेही फरेरा यांनी न्यायालयाला सांगितले. 

फरेरासह वेरनॉन गोंसालवीस, अॅड. सुधा भारद्वाज यांना पोलिस कोठडी संपल्याने न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी फरेरासह तिघांना 19 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT