बारामती शहर : अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले तर मला सर्वात जास्त आनंद होईल. कुठल्या आईला असं वाटत नाही की आपला मुलगा राज्याचा मुख्यमंत्री व्हावा. त्याला प्रचंड मताधिक्याने विजयी करावे आणि लोकांनी त्याला ही संधी द्यावी, अशी अपेक्षा अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (सोमवार) सकाळी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजाविला. बारामतीजवळील काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांच्या मातोश्रींनी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केल्या.
राजकारणात कधीही येणार नाही : जय पवार
आपण राजकारणात कधीही येणार नाही. राजकारणा व्यतिरिक्त राष्ट्रवादीचे नेत्यांचा प्रचार करणे व पक्ष संघटनेचे काम करणे. यातच आपण काम करणार असल्याचे, अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी सांगितले. आज बारामतीत काटेवाडी येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आपणास करण्यात येणार नाही असा खुलासा केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.