Rohit Pawar
Rohit Pawar 
पुणे

पूनम महाजन तेव्हा गांधारी झाल्या होत्या का?; रोहित पवारांचे टीकास्त्र

सकाळवृत्तसेवा

बारामती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घाटकोपरच्या सभेत शकुनीमामाचा आरोप करणाऱ्या भाजप नेत्या पूनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी गांधारीची उपमा देत टिका केली.

राज्यातील भाजपच्या नेत्यांनी आजवर महिलांबाबत बेताल विधाने केली, तेव्हा पूनम महाजन डोळ्यावर पट्टी बांधून होत्या, आता डोळ्यावर पट्टी बांधून महाभारत कोणी पाहिले ते तुम्हीच सांगा अशा शब्दांत रोहित पवार यांनी पवार यांच्यावरील टिकेचा समाचार घेतला.

पूनम महाजन या घाटकोपर येथील सभेत राहूल गांधी, प्रियांका गांधी यांच्यावर टिका करीत शरद पवार यांच्यावरही घसरल्या. त्यांनी पवार यांच्यावर टिका करीत ते इकडचे तिकडे करतात असे सांगून ते शकुनीमामा आहेत अशी टिका केली. त्याला जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करीत उत्तर दिले, त्याचबरोबर रोहित पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. रोहित पवार यांनी यावर पूनम महाजन यांच्यावर टिका करताना म्हटले की, जलसंपदामंत्री गिरीष महाजन म्हणाले होते की,`दारूच्या ब्रॅण्डला महिलांची नावे द्या, मग खप कसा वाढतो ते बघा. दुसरे विधान भाजपचे मंत्री गिरीष बापट यांनी केले होते. ते म्हणाले होते की, “तुमच्या मोबाईलमध्ये काय असतं ते माहित आहे, तुम्ही मला म्हातारे समजू नका, या पिकल्या पानाचा देठ अजून हिरवा आहे. आणि त्यावर कडी करीत भाजपच्याच राम कदम यांनी तर “पोरी पटत नसतील तर पळवून आणा मी तुमच्या पाठीशी आहे… असली वक्तव्ये केली होती. ही वक्तव्ये आता सांगण्याचे कारण म्हणजे ही वक्तव्ये झाली, तेव्हा पूनम महाजन डोळ्यावर पट्टी बांधून होत्या. स्वपक्षातील लोकांनी केलेली वक्तव्ये त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधूनच पाहिलीही नाही आणि ऐकलीही नाहीत.`

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT