पुणे

'वाहतूककोंडी मुक्त वाघोली ठेवण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज'

वृत्तसंस्था

वाघोली- लोणीकंद पोलीस, ग्रामपंचायत वाघोली, परिसरातील युवक, सोसायटीधारक यांनी संयुक्तरित्या केलेल्या उपाययोजना व मदतीमुळे आठवडेभरपासून वाघोलीतील वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला आहे. कोंडी मुक्त वाघोली ठेवण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज असून नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन लोणीकंद पोलीस व ग्रामपंचायतीने केले आहे.

हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांच्या उपस्तिथीत कोंडीमुक्त वाघोली ठेवण्यासाठी काय करावे लागेल यावर चर्चा झाली. दरम्यान वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर तसेच विना परवाना वाहन चालविणाऱ्या शाळेतील मुले व त्यांच्या पालकांवर कडक कारवाई करणार असल्याचे पोलिसानी सांगितले. चर्चेवेळी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल, उपसरपंच संदीप सातव, कृष्णकांत सातव, संपत गाडे उपस्थित होते.

या सहकार्याची गरज
1) नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.
2) ‎चौकात उलट्या दिशेने वाहतूक करू नये.
3) ‎बाईफ रोडला जाण्यासाठी शंकर पार्वती मंगल कार्यालया जवळील रस्त्याचा वापर करावा.
4) ‎वळण घायचे असल्यास उजव्या लेन चा वापर करावा.
5) ‎चौकात बेशिस्त वाहन चालवू नये.
6) ‎वाहतूक पोलीस , वॉर्डन, पोलीस मित्र, स्वयंसेवक याना सहकार्य करावे.
7) ‎पुणे नगर महामार्गलगत साईट रस्त्यावर वाहने पार्क करू नये.
8) शक्य होईल तेवढ्या अंतर्गत रस्त्यांचा वापर करावा.  
9) ‎सिग्नल्स सुरू झाल्यानंतर त्याचे पालन करावे.
10) पालकांनी परवाना नसल्यास मुलांना वाहने देऊ नये.

त्यांनी संपर्क साधावा......
वाघोलीतील वाहतूक कोंडीचे नियंत्रण, ग्रामसुरक्षा, तंटा मुक्त परिसर अशा अनेक कामाच्या मदतीसाठी पोलिसांना स्वयंसेवक, पोलीस मित्रांची गरज पडते. ज्या युवकांना, नागरिकांना स्वयंसेवक व पोलीस मित्र म्हणून काम करण्याची इच्छा आहे त्यांनी 9421857799 या क्रमांकाच्या व्हाट्सउपवर आपले नाव, गाव, मोबाईल नंबर व फोटो पाठवावा. कृपया कॉल करू नये. असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुहास गरुड यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क; नवीन आदेश 'या' तारखेपासून लागू

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT