loni-kalbhor
loni-kalbhor 
पुणे

रोडरोमीयो विरोधात मुलीनींच ठामपणे उभे राहण्याची गरज

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर - शालेय व महाविद्यालयीन विध्यार्थींनीना छेडणाऱे रोडरोमीयो व छळ करणाऱ्यांच्या विरोधात स्वतः मुलीनींच ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. पोलिसांच्याकडुन दामिनी पथकाच्या माध्यमातुन रोडरोमियो वर प्रभावीपणे कारवाई करण्याचे काम चालुच आहे. मात्र रोडरोमियोगिरी करणाऱ्यांची नावे व त्यांच्या वाहनांचे नंबर पोलिसांना दिल्यास, संबधितावर पोलिसांना तात्काळ कारवाई करणे सोपे जाते. वरीष्ठ पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी कायमच शालेय व महाविद्यालयीन विध्यार्थीनींच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. संकट आल्यास विध्यार्थीनीनीही पोलिसांना आपल्या कुटुबांतील एक घटक समजुन मदत मागावी असे आवाहन लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी बुधवारी (ता. 9) केले.

महाराष्ट्र पोलिस रेझींग डे निमित्त लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेच्या शंभरहुन अधिक विद्यार्थिनीनी गुरुवारी (ता. 10) लोणी काळभोर पोलिस ठाण्याला भेट दिली. या भेटी दरम्यान विध्यार्थीनीनी पोलिसांच्या दैनदिन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी पोलिस ठाण्यात विध्यार्थीनीशी संवाद साधतांना पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी वरील आवाहन केले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना क्रांतीकुमार पाटील म्हणाले, पोलिस यंत्रना जनतेच्या रक्षणासाठी चोविस तास काम करत असते. छेडछाड होत असल्यास, महिला असो वा विध्यार्थीनी सर्वानिच आपला पोलिसांना मित्र मानुन मदतीसाठी हात पुढे् करण्याची गरज आहे. छेडछाड करणाऱ्यांची नावे अथवा ते वापरत असलेल्या वाहनांचे नंबर पोलिसांना दिल्यास, छेडछाड करणाऱ्यावर कारवाई करणे सोपे जाते. विध्यार्थीनी व महिलांनी फोनवरुन अथवा सोशल मिडीयाच्या माध्यमातुन अनोळखी व्यक्तींच्या बरोबर संवाद साधु नये. अनोळखी व्यक्तीशी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन झालेल्या ओळखीतुन घडत असलेल्या गुन्हांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पालकांनीही एका ठराविक मर्यादेप्रयंत आपल्या मुला-मुलीच्या फोन वापरावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी विध्यार्थीनीना सीसीटीएनएस संगणक प्रणाली, वाहतुकीच्या नियमांचे पालन, सायबर गुन्ह्यांबाबत घ्यावयाची काळजी, घटनास्थळी पुरावे कसे गोळा करावेत, शस्त्र-दारुगोळा, श्वान पथक, बॉम्बशोधक-नाशक पथक, इन्व्हेस्टिगेशन व्हॅन, सीसी टीव्ही कमांड कंट्रोलचे कार्य, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक (क्विक रिस्पॉन्स टीम) यांचे कार्य; तसेच बिनतारी संदेश यंत्रणाबाबतची माहिती दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT