पुणे

सांगवीत साडेनऊ लाखांची फसवणूक 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ओएलएक्‍सवर विकलेल्या मोटारीचे पैसे न देता विविध कारणे सांगून एक लाख दहा हजार रुपये उकळून एकाची साडेनऊ लाखांची फसवणूक सांगवीत झाली आहे. 

मिता प्रणवकुमार भट्टाचार्य (वय 58, रा. पवनानगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी ठाण्यात फिर्याद दिली. संजय गुलाबचंद गिडवानी (पत्ता माहिती नाही), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भट्टाचार्य यांनी मोटार विकण्याची जाहिरात ओएलएक्‍सवर प्रसिद्ध केली. ती पाहून गिडवानी यांनी संपर्क साधला तसेच मोटारीच्या खरेदीसाठी आठ लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र तो वटला नाही. यामुळे त्यांनी पुन्हा गिडवानी यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा बॅंक खात्यात 60 हजार रुपये कमी असल्याने धनादेश वटला नसल्याचे सांगितले. भट्टाचार्य यांना खात्यात 60 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर एका व्यक्‍तीचे माझ्याकडे 50 हजार रुपये आहेत. ते पैसे त्याला दिल्यास मोटार सुटेल, अन्यथा तुमच्या मुलाच्या नावावर मोटार असून तिचा गैरवापर केल्याचा ठपका येईल, असे सांगून पुन्हा 50 हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भट्टाचार्य यांनी सांगवी ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT