fraud2.jpg
fraud2.jpg 
पुणे

विवाहाचे आमिष दाखवून महिलेची नऊ लाखाची फसवणूक 

सकाळवृत्तसेवा

पुणे : विवाहविषयक वेबसाईटवरुन ओळख झालेल्या व्यक्तीने विवाहाचे आमिषाने एका बँक कर्मचारी महिलेची तब्बल नऊ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार मागील वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत घडला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन रवीश डेव्हीड व त्याच्या साथीदाराविरुद्ध विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला घटस्फोटीत असून त्या खराडी येथील एका बँकेमध्ये कार्यरत आहेत. संबंधीत महिलेस पुर्नविवाह करायचा असल्याने तिने एका विवाहासंबंधीच्या संकेतस्थळावर मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात नावनोंदणी केली होती. तेथून संपर्क क्रमांक घेऊन रवीश डेव्हीड असे नाव सांगणाऱ्याने संबंधीत महिलेशी संपर्क साधला. आपण अमेरिकेतील एका नामांकीत विमान कंपनीमध्ये वैमानिक असल्याचे त्याने महिलेस सांगून तिचा विश्‍वास जिंकला. 

दरम्यान, महिलेशी ओळख वाढविल्यानंतर रवीशने त्यांना परदेशातून भेटवस्तू पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने आपण कुरीअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगून तुमच्या नावाने परदेशातून भेटवस्तु पाठविल्याची त्यांना बतावणी केली. त्यानंतर भेटवस्तू घेण्यासाठी तत्काळ एक लाख 80 हजार रुपये बँकेत भरण्यासाठी सांगितले. त्यावेळी महिलेने इतकी रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविली. दरम्यान, महिलेस भेटवस्तुंचे खोके ताब्यात न घेतल्यास परकीय चलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे महिलेने घाबरून वेळोवेळी नऊ लाख दोन हजार रुपये भरले. 

त्याचवेळी महिलेने रविशच्या वैमानिक ओळखपत्राबाबत चौकशी केली. त्यावेळी ते बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT