Mokka crime
Mokka crime Sakal
पुणे

Mcoca Crime : नितीन म्हस्केचा खून करणाऱ्या यल्ल्या टोळीवर मोका

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मंगला चित्रपटगृहाजवळ नितीन म्हस्केचा खून करणाऱ्या सागर ऊर्फ यल्ल्या कोळानट्टी याच्यासह टोळीतील २० जणांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाई केली. नितीन म्हस्के आणि त्याचा मित्र १६ ऑगस्ट रोजी रात्री चित्रपट बघून घरी निघाले होते.

मंगला चित्रपटगृहाबाहेर आल्यानंतर यल्ल्या टोळीने नितीनच्या डोक्यात, मानेवर तलवार आणि लोखंडी गजाने वार केले. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यात ताडीवाला रस्ता येथील सागर ऊर्फ यल्ल्या इराप्पा कोळानट्टी (वय ३५), सुशील अच्युतराव सूर्यवंशी (वय २७), मल्लेश शिवराज कोळी (वय २४), मनोज विकास हावळे (वय २३), रोहन मल्लेश तुपधर (वय २३), शशांक ऊर्फ ऋषभ संतोष बेंगळे (वय २१), गुडगप्पा फकीराप्पा भागराई (वय २८), किशोर संभाजी पात्रे (वय २०, रा. रमाबाई आंबेडकर रस्ता), साहिल ऊर्फ सल्ल्या मनोहर कांबळे (वय २०), गणेश ऊर्फ गणपत शिवाजी चौधरी (वय २४, रा. ढोले पाटील रस्ता), रोहित ऊर्फ मच्छी बालाजी बंडगर (वय २०), विकी ऊर्फ नेप्या काशिनाथ कांबळे (वय २२), इम्रान हमीद शेख (वय ३१), लॉरेन्स राजू पिल्ले (वय ३६), आकाश सुनील गायकवाड ऊर्फ चड्डी (वय २२, रा. जनता वसाहत), विवेक भोलेनाथ नवघरे (वय २५), अक्षय ऊर्फ बंटी विजय साबळे (वय २५, रा. केशवनगर), विनायक गणेश कापडे (वय २१), प्रदीप संतोष पवार (वय २१) आणि सौरभ बाळू ससाणे (वय २०, तिघे रा. विमाननगर) यांना अटक केली होती. आरोपींवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी या टोळीवर मोका कायद्यान्वये कारवाईचे आदेश दिले होते. याबाबत सहायक पोलिस आयुक्त वसंत कुवर यांनी पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्यामार्फत मोकाचा प्रस्ताव पाठविला. त्यास अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी मंजुरी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT