Horn
Horn 
पुणे

बारा सप्टेंबरला ‘नो हॉर्न डे’

सकाळवृत्तसेवा

पुणे - विनाकारण हॉर्न वाजविल्यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे १२ सप्टेंबरला शहर व जिल्ह्यात ‘नो हॉर्न डे’ अभियान राबविले जाणार आहे. आरटीओ व शहर वाहतूक विभाग यांच्या वतीने हे अभियान होणार आहे.

पुणे जिल्ह्यातील वाहन संख्या ५८ लाख ७२  हजार ८११ इतकी आहे. या वाहनांच्या हॉर्नमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. विनाकारण हॉर्न वाजविण्याचे प्रमाण ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. हॉर्नच्या अतिवापरामुळे समोरील वाहनचालक गोंधळून जाऊन अपघात होण्याची शक्‍यता असते. हे प्रमाण कमी व्हावे, यासाठी आरटीओने जनजागृतीवर भर देण्याचे ठरविले आहे. यासंदर्भातील माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिली. या वेळी वाहतूक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत उपस्थित होते.

कसा होणार ‘नो हॉर्न डे’? 
आरटीओ व वाहतूक पोलिस १२ नोव्हेंबरला शहरातील प्रत्येक चौकात वाहनचालकांनी हॉर्न वाजवू नये, असे आवाहन करतील. त्यादृष्टीने ठिकठिकाणी आरटीओ व पोलिसांतर्फे आवाहनाची व्यवस्था केली जाणार आहे. 

घोषवाक्‍य, जिंगल्ससाठी स्पर्धा
या अभियानात ‘नो हॉर्न’ या विषयावर व्हिडिओ क्‍लिप, जिंगल्स, पोस्टर्स व घोषवाक्‍य तयार करण्यासाठी स्पर्धाही घेण्यात आली आहे. उत्कृष्ट कलाकृतींसाठी आकर्षक व रोख स्वरूपाचे बक्षीसही असणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी स्पर्धकांनी आपली कलाकृती nohornmh१२@gmail.com या ई-मेलवर पाठवावी. व्हिडिओ क्‍लिप, जिंगल, पोस्टर्स व घोषवाक्‍य या चारही गटांना रोख बक्षीस दिले जाणार आहे. प्रथम क्रमांक २५ हजार, द्वितीय क्रमांक १५ हजार व तृतीय क्रमांक १० हजार रुपये असे प्रत्येक गटाला तीन बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धकांनी ई-मेलमध्ये नाव, पत्ता, नमूद करावा, असे आवाहनही केले आहे. 

विनाकारण हॉर्न वाजवल्यास कारवाई
अनेक जण विनाकारण हॉर्न वाजवितात. तर काहींना हॉर्न वाजविण्याची अधिक हौस असल्याने त्यांच्याकडून हॉर्न मॉडिफाय केले जातात. सायलेन्सरलाही फटाक्‍यांचे आवाज दिले जाता. अशा बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 

‘नो हॉर्न डे’मध्ये सहभागी संस्था
जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिक्षण, आरोग्य व रस्ते बांधकाम विभाग, राज्य परिवहन महामंडळ (एसटी), पीएमपीएल, रिक्षा, ट्रक, टेंपो, बस वाहतूकदार संघटना, ड्रायव्हिंग स्कूल, रोटरी क्‍लब, लायन्स क्‍लब यांच्यासह विविध संस्था, संघटनांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT