rain
rain 
पुणे

दिवाळीमध्ये पाऊस जाणार सुटीवर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - रोजच्यारोज आपली उपस्थिती ठळकपणे जाणवून देणारा पाऊस आता येत्या रविवारपासून (ता. २७) दिवाळीच्या सुटीवर जाणार आहे. ‘क्‍यार’ या चक्रीवादळाचा प्रभाव सध्या शहरावर जाणवत असल्याने शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले असून, पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या. मात्र, हे चक्रीवादळ पुढील चोवीस तासांमध्ये ओमानकडे सरकेल. त्यामुळे पुण्यातील पाऊस कमी होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे शुक्रवारी वर्तविला.

अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून सध्या शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या चक्रीवादळामुळे आलेले बाष्प सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या आकाशात दिसत आहे. त्यामुळे पुण्यात पाऊस पडत आहे; पण शनिवारनंतर (ता. २६) आकाश अंशतः निरभ्र होईल, अशी माहिती हवामान खात्याचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्‍यपी यांनी दिली.

शहरात शुक्रवारी दिवसभर पावसाळी वातावरण होते. या पाश्‍वभूमीवर ‘सकाळ’शी बोलताना डॉ. काश्‍यपी म्हणाले, ‘‘शहर परिसरात येत्या शनिवारी (ता. २६) सायंकाळी काही भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल. या वेळी वाऱ्याचा वेग वाढलेला असेल. हा पाऊस अगदी हलक्‍या स्वरूपाचा असण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्‍यता नाही.’’
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT