पुणे

मुदत संपलेली रक्ताची बॅग दिल्याने नोटीस 

सकाळवृत्तसेवा

पुणे : रुग्णाला मुदत संपलेली रक्ताची बॅग दिल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मंगळवार पेठेतील ओम रक्तपेढीला "कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. ओम रक्तपेढीतून मुदतबाह्य रक्ताची बॅग रुग्णाला दिली होती. याबाबत योगेश लासुरे यांनी "एफडीए'कडे 19 ऑक्‍टोबरला तक्रार केली होती. त्याची तातडीने दखल घेऊन रक्तपेढीची कसून तपासणी करण्यात आली. त्यात रक्ताच्या बॅगवरील तारीख चुकलेली असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रक्ताच्या बॅगवर लावलेले लेबल चुकीचे असल्याचे तपासणीतून पुढे आले. 

याबाबत "एफडीए'चे सहआयुक्त विद्याधर जावडेकर म्हणाले, "22 सप्टेंबरला झालेल्या रक्तदान शिबिरातून रक्त संकलित केले होते. त्यातून वेगळ्या केलेल्या रक्तपेशीच्या बॅगवर लावलेली तारीख चुकली होती. त्यामुळे रक्तपेढीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.'' 
या तपासणीत रजिस्टरमध्ये खाडाखोड दिसून आली आहे. तसेच, एका शीतकरण यंत्रणेत दोष आढळून आला आहे. त्याबाबत रक्तपेढीला त्यांची बाजू मांडण्यासाठी कारणे दाखवा नोटीसमधून सात दिवसांची वेळ दिली आहे. त्यांची बाजू ऐकून पुढील कारवाई करणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT