construction
construction 
पुणे

अनाधिकृत बांधकामांना मांजरी ग्रामपंचायतकडून नोटीस 

कृष्णकांत कोबल

मांजरी - अनाधिकृत इमारती उभारणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांना मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतने नोटीस पाठवून अधिकृत परवानगी आवश्यक केली आहे. परवानगी न घेता अनधिकृतपणे होत असलेल्या बांधकामांबाबत पीएमआरडी कडे तक्रार करणार असल्याची तंबी या नोटीसीद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे येथील अनाधिकृत बांधकाम व्यावसायिक धास्तावले असून त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांची धावपळ उडाली आहे.  

मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत सुमारे साडेतीनशेच्यावर अनाधिकृत व्यवसायिक बांधकामे आहेत. या सर्वांना सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकाच्या सहीने नोटीस पाठविण्यात आलेल्या आहेत. याशिवाय अशा अनाधिकृत बांधकामांचे वीजजोड, नळजोड तोडण्याची कारवाई केली जात आहे. 

पालिका हद्दीला लागून असलेली सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून मांजरी ग्रामपंचायत कडे पाहिले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणातील बांधकाम व्यावसायिकांनी येथे अनाधिकृत गृहप्रकल्प सुरु केले आहेत. त्यावर सध्या कोणत्याही प्रकारचे नियंत्रण दिसत नाही. त्यामुळे भविष्यात येथे असुविधा निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. मात्र, यातील अनेक इमारतींमध्ये मिळकतदार राहत असून, त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

"ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या मोठ्या प्रमाणातील अनाधिकृत बांधकामांमध्ये सामान्य गरीब माणूस राहत आहे. पोटाला चिमटा घेऊन घरे घेतली आहेत. त्यांना बेघर न करता काही प्रमाणात दंड आकारून अनाधिकृत बांधकामे नियमित करणे गरजेचे आहे. पीएमआरडीने त्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मात्र , सध्या ग्रामपंचायतीकडून चुकीच्या पद्धतीने नोटीस काढून नागरिकांना भिती दाखवली जात आहे. एमएसईबीने अधिकृतपणे दिलेले वीजजोड ग्रामपंचायतकडून बेकायदेशीरपणे तोडले जात आहेत. बांधकाम व्यावसायिक व सामान्य नागरिकांना भिती दाखवून लाभ मिळवायचा प्रयत्न अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. हद्दीतील सर्व बांधकामे नियमित केली जावीत, अन्यथा ग्रामपंचायत समोर तीव्र आंदोलन केले जाईल.'
अजिंक्य घुले, उपसभापती, पंचायत समिती 

"अनाधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्याप्रमाणात सेवासुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत. भविष्यात सर्वांनाच त्रास होण्याचा धोका आहे. त्यामुळे अनाधिकृत बांधकामावरील कारवाई बाबत आम्ही अग्रही आहे. त्यादृष्टीने अशा बांधकामांना नोटीस पाठविल्या आहेत.'
शिवराज घुले, सरपंच, मांजरी बुद्रुक

"ग्रामपंचायतने मागणी केल्यानुसार नवीन होत असलेल्या बारा बांधकामांची वीज तोडण्यात आली आहे. मात्र, ज्या इमारतीमध्ये लोक राहत आहेत, तेथे ही कारवाई केलेली नाही.''
महेश धाडवे, सहाय्यक अभियंता, एमएसईबी मांजरी शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT