पुणे

दुर्बीण, आयुका पाहण्याची संधी

सकाळवृत्तसेवा

पुणे - गुरुत्व लहरींच्या शोधासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या ‘लायगो’ प्रयोगशाळेच्या माहितीसह खगोलशास्त्रातील प्रात्यक्षिके, रेडिओ दुर्बिणीची कार्यप्रणाली जाणून घेण्याची संधी पुणेकरांना ‘राष्ट्रीय विज्ञान दिना’निमित्त गुरुवारी (ता.२८) मिळणार आहे. शहरातील नामांकित विज्ञान संशोधन संस्था आपल्या आवारात नागरिकांना खुला प्रवेश देणार आहेत.

आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र व खगोलभौतिकीशास्त्र केंद्र (आयुका) गुरुवारी नागरिकांसाठी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत खुले राहणार आहे. गुरुत्व लहरींच्या शोधासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या ‘लायगो’ प्रयोगशाळेच्या माहितीबरोबरच फोकाल्ड दोलक, खगोलशास्त्रातील प्रात्यक्षिके येथे पाहता येतील. नामांकित शास्त्रज्ञांचे सायंकाळी सहा वाजता व्याख्यान होणार आहे. त्यानंतर नागरिकांना सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आकाशदर्शनाचा अनुभव घेता येईल.

‘रेडिओ दुर्बिणी’चे रहस्य उलगडणार
राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रात ‘रेडिओ दुर्बीण’ प्रकल्पाची माहिती, कार्यप्रणालीबद्दल जाणून घेता येणार आहे. अवकाश विज्ञानातील विविध प्रात्यक्षिके बघता येतील. संस्थेच्या खोडद येथील ‘जीएमआरटी’मध्ये गुरुवारी (ता.२८) व शुक्रवारी (ता.१) भव्य विज्ञान प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे.

विद्यापीठात विज्ञान प्रदर्शन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘सायन्स पार्क’तर्फे पर्यावरणशास्त्र विभागात विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळात खुले राहणार आहे. प्रदर्शनामध्ये शालेय विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून सहभागी होणार आहेत. 

‘सी-डॅक’ची कार्यप्रणाली पाहा
‘सी-डॅक’मध्ये वेगवेगळ्या संगणकीय, गणितीय कार्यप्रणालीची प्रदर्शने नागरिकांना पाहता येणार आहेत. 
राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्रही (एनसीसीएस) खुले राहणार आहे. आघारकर संशोधन संस्थेत जीवाश्‍म, सोयाबीन द्राक्षाचे संकरित वाण, औषधी वनस्पती, बुरशी,  दगडफुल यांचे प्रदर्शन सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळात पाहता येणार आहे.

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : इशान किशन अन् नेहलनं डाव सावरला

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT