पुणे

भोरच्या विकासासाठी एकवटले अधिकारी

सकाळवृत्तसेवा

नसरापूर - राज्यातील विविध भागांत अधिकारी म्हणून काम करणारे आणि मूळचे भोरवासीय असलेले अधिकारी व उच्चपदस्थ एकवटले आहेत. भोरच्या विकासासाठी दीपावलीच्या मुहूर्तावर एक सामाजिक संस्था स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. पहिल्या उपक्रमात मान्यवर व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात आला.

भोरमधील प्राथमिक शिक्षक भीमराव शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. भोईराज तरुण मंडळ भोर, सह्याद्री रेस्क्‍यू फोर्स, ध्रुव प्रतिष्ठान टिटेघर, अग्निहोत्र सेवा मंडळ नसरापूर, संकल्प प्रतिष्ठान भोर, महिलांसाठी काम करणाऱ्या सीमा तनपुरे, शिक्षण क्षेत्रात काम करणारे डॉ. विनय कुलकर्णी, योगशिक्षक डॉ. आनंदा कंक, शवविच्छेदन करणाऱ्या शीतल चव्हाण, अनाथ मुलींचे २२ वर्षे शैक्षणिक पालकत्व घेणारे संजय देवकर, सामाजिक कार्यकर्ते समीर घोडेकर, महाराष्ट्र क्रिकेट संघात समावेश झालेला सिद्धेश वीर, उत्कृष्ट मल्ल अनिकेत खोपडे, ७२ प्रवाशांचे प्राण वाचवणारे एसटी चालक नामेदव बांदल, बाळासाहेब शिंदे या सर्वांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास माजी कामगार आयुक्त संभाजी काकडे, माजी पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे, उच्च न्यायालयातील सरकारी वकील विठ्ठल कोंडे, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्‍वर खुटवड, उपजिल्हाधिकारी विक्रम बांदल, आयकर उपायुक्त तानाजी थोपटे, उपायुक्त आशा राऊत आदी तालुक्‍यातील सुमारे २० अधिकारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT