Water
Water 
पुणे

आजींची पाणीबाणी; इंग्लंडमधून तक्रार!

सकाळवृत्तसेवा

पुणे - पोलिसांच्या ज्येष्ठ नागरिक कक्षात नागरिक फोन करून अनेक प्रकारच्या तक्रारी करत असतात. आता तर थेट एका ७० वर्षीय महिलेने इंग्लंडवरून ई-मेल करून ‘शुक्रवार पेठेतील माझ्या घराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे, तो माझ्या काकाने बंद केला आहे. तो पुन्हा सुरू करून द्यावा,’ अशी तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी शहानिशा केली असता या महिलेने १० वर्षांपासून पाणीपट्टी भरली नसल्याचे समोर आले. 

पोलिस आयुक्तालयातील ‘भरोसा’ सेलमधील ज्येष्ठ नागरिक कक्षात हेल्पलाइनवर ‘लाइट गेली’, ‘पाणी येत नाही’, ‘उसने पैसे परत मिळत नाहीत’ यांपासून ‘सून त्रास देते’, ‘शेजारी भांडण करतो’ अशा तक्रारी येतात. एका ७० वर्षीय महिलेने पोलिस आयुक्तालयाला ई-मेल केला. ‘शुक्रवार पेठेत माझा फ्लॅट आहे. मला या घराची स्वच्छता करायची असल्याने कामगार तेथे गेले, त्या वेळी माझ्या काकांनी मला त्रास देण्यासाठी घराचे पाणी बंद केल्याचे समोर आले. आपण माझ्या काकांना बोलावून घेऊन योग्य ती समज देऊन पाणीपुरवठा सुरू करून द्यावा,’ अशी तक्रार केली. ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या पोलिस निरीक्षक स्वाती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जयश्री जाधव यांनी तपास केला. पोलिसांनी महिलेच्या काकांना फोन करून त्यांच्याकडे चौकशी केली; पण त्यांनी त्यांच्या फ्लॅटचा पाणीपुरवठा बंद झाला आहे, याची मला माहिती नाही, असे सांगितले. या महिलेने या फ्लॅटची ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ त्यांच्या बंगळुरू येथील भाच्याला दिली असल्याने त्यांच्याकडे चौकशी केली. त्या वेळी त्यांनी तक्रारदार महिलेने सुमारे १० वर्षांपासून पाणीपट्टी भरली नसल्याने पाणीपुरवठा बंद केला असावा, असे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी या तक्रारदार महिलेला वस्तुस्थिती सांगून समजपत्र पाठविले.

पोस्टाने पाठवली घराची चावी
पोलिसांनी घरातील पाणीपुरवठा सुरू करावा, यासाठी या महिलेने त्यांच्या भाच्याला सूचना देऊन पोस्टाने पोलिसांना चावी पाठविण्यास लावली. मात्र, घराचे मालक किंवा ज्यांना जबाबदारी दिले ते समोर नसल्याने घराचे कुलूप उघडण्याचे अधिकार पोलिसांना नाहीत, त्यामुळे घराची चावी महिलेच्या भाच्याला पोस्टाने परत पाठवून दिली आहे, तसे या महिलेसही कळवले आहे, असे पोलिस निरीक्षक थोरात यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT