PMPML_bus_0.jpg
PMPML_bus_0.jpg 
पुणे

पुण्यात पीएमपीएल बसमध्ये वृद्ध महिलेच्या दागिन्यांची चोरी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पीएमपीएल बसमधून प्रवास करताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी एक वृद्ध महिलेच्या हातातील 62 हजार 500 रुपये किंमतीच्या सोन्याच्या पाटल्या कापून चोरुन नेल्या. ही घटना 25 ऑक्‍टोबरला दुपारी एक वाजता नवी सांगवी ते शिवाजीनगर प्रवासादरम्यान घडली. याप्रकरणी 63 वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या वैयक्तीक कामानिमित्त 25 ऑक्‍टोबरला दुपारी पीएमपीएल बसने प्रवास करीत होत्या. त्या सांगवी येथून नवी सांगवी-स्वारगेट या बसमध्ये बसल्या होत्या. त्यानंतर बसमधील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या हातातील सोन्याची पाटली कापून चोरुन नेली.

बसमधून उतरताना त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तत्काळ शिवाजीनगर पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दाखल केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण करीत आहेत.  

पीएमपीएल बस प्रवासात महिलेच्या दागिन्यांची चोरी
पीएमपीएल बसमधून पतीसमवेत प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी रोख रकमेसह ६० हजार ८०० रुपयांचे दागिने चोरुन नेले. ही घटना शुक्रवारी(ता.1) सकाळी अकराच्या सुमारास निगडी ते स्वारगेट बसप्रवासात घडली. याप्रकरणी विलास महाजन (वय ५९, रा. पंढरपूर ) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाजन दाम्पत्य शुक्रवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास निगडी-स्वारगेट पीएमपीएल बसने प्रवास करीत होते. त्यावेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन महाजन यांच्या पत्नीच्या पर्समधून रोख रकमेसह ६० हजार ६००रुपयांचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार धोत्रे अधिक तपास करीत आहेत.

बस प्रवासात महिलेची पर्स लंपास
पीएमपीएलबसने टिंगरेनगर-पुणेस्टेशन प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून दोन महिला चोरट्यांनी २५ हजार रुपयांच्या रोख रकमेसह ५३ हजार ५०० रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरुन नेला.ही घटना रविवारी (ता.4) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी एका ३६ वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूड इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT