पुणे

इन्स्टाग्रामवर तरुणीचा नग्न फोटो अपलोड करणाऱ्यास अटक

रवींद्र जगधने

पिंपरी : शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय तरुणीचे इन्स्टाग्राम अकाउंड हॅक करुन त्यावर तरुणीचा चेहरा असलेले नग्न छायाचित्र अपलोड करत तिची बदनामी केली. याप्रकरणी अलिबाग येथून पिंपरी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीला न्यायालयाने मंगळवारपर्यंत (ता. 11) पोलिस कोठडी सुनावली.

रोहित राजेंद्र पाटील (वय 19, रा. मुळे, ता. अलिबाग, जि. रायगड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. हा प्रकार जानेवारी ते 11 ऑगस्ट दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित व पीडित तरुणी एकाच गावातील असून तरुणीचे इन्स्टाग्राम या सोशल मीडिया माध्यमाचे अकाउंड हॅक केले. त्यावर फोटो एडिटिंग सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तरुणीचा चेहरा असलेले नग्न छायाचित्र अपलोड केल्याचा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार तपास करत असताना हे छायाचित्र रोहित याने अपलोड केल्याचे समोर आले.

हा गुन्हा सायबर सेलने पिंपरी पोलिस ठाण्यात वर्ग करताच पिंपरी पोलिसांनी रोहितच्या विरोधात विनयभंग, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये शुक्रवारी रात्री त्याला अलिबागमधील मुळे गावातून अटक केली. या प्रकरणाचा तपास निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT