PM_Narendra_Modi 
पुणे

...म्हणून पंतप्रधानांना देशभरातून केले जाणार १ लाख फोन; काय आहे 'हे' प्रकरण?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शेतकरी आणि कामगारांच्या खात्यावर थेट १५ हजार जमा करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात एक लाख फोन करणार असल्याचे किसान आर्मी आणि वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी सांगितले. १० ऑगस्ट रोजी राज्यासह देशभरातून हे अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील नागरिकांसह कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले. 

पंतप्रधानांनी कोरोनावरील लस आणि औषधासंदर्भात जनतेसमोर भूमिका मांडावी, राष्ट्रीय भावना वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करावेत आदी सात मागण्या करण्यात आल्या आहेत. यासंबंधी पंतप्रधान कार्यालयात तक्रार नोंदवली असून, त्याचे समाधानकारक उत्तर न आल्याने आम्ही देशभरातून एक लाख लोक फोन करून आंदोलन करणार आहोत. विविध संस्था आणि नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन कदम यांनी केले आहे. 

किसान आर्मीच्या पंतप्रधानांकडे या मागण्या : 
- शेतकरी, कष्टकरी, मोलमजुरी करणाऱ्यांच्या खात्यावर थेट १५ हजार जमा करावे. 
- पंतप्रधानांनी कोरोनावरील औषध आणि निवारण कार्यक्रम जनतेसमोर जाहीर करावा. 
- सर्व पक्षातील नेत्यांना सोबत घेऊन सैन्याला मानवंदना द्यावी. 
- कोरोनातून बरे होणाऱ्यांना नेमकी कोणती औषधे दिली. हे लोकांना सांगावे. 
- प्रत्येक राज्यात विरोधी पक्ष मदत व सल्लागार समिती स्थापन करावी. 
- राज्यपालांनी जनतेसाठी काय केले याचा अहवाल प्रत्येक राज्याने द्यावा. 
- कोरोना विरुद्ध लढणारे आरोग्य कर्मचारी, पोलिस आदींना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा व विशेष साहाय्य द्यावे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Jaysingrao Pawar Passes Away: शिव-शाहूकालीन इतिहास उजळवणारा संशोधक हरपला; डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन!

Satara ZP Controversy: सातारा झेडपीतील गोंधळाचे मंत्री गोरेच सूत्रधार: देसाई, मांडवे; आमचा एन्काउंटर करण्याचा पोलिसांचा होता डाव!

US Iran Conflict : मोठा दिलासा ! गॅस तुटवड्याचं संकट टळणार, इराणने भारतासाठी खुली केली होर्मुझची सामुद्रधुनी

लाडक्या बहिणींना मिळणार ४५०० रुपये! एप्रिलमध्ये ज्यांना मिळेल लाभ, त्यांचाच सुरु राहणार लाभ; ‘ई-केवायसी’तील दुरुस्तीसाठी ३१ मार्च मुदत, वाचा...

Panchang 26 March 2026 : दत्त कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT