One thousand Khelo India centers by August 2023 Anurag Singh Thakur pune sakal
पुणे

देशात ऑगस्ट २०२३ पर्यंत एक हजार ‘खेलो इंडिया केंद्र’ उभारणार - अनुराग सिंह ठाकूर

केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांचे आश्वासन

सकाळ वृत्तसेवा

पुणे :‘‘संपूर्ण देशात ‘खेलो इंडिया’ची कमीत कमी एक हजार केंद्र असावीत, असा केंद्र सरकारचा मानस आहे. आतापर्यंत ४५० खेलो इंडिया केंद्रांना मंजुरी दिली असून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत जवळपास एक हजार केंद्रांना मंजुरी मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या केंद्रामार्फत माजी खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून नेमले जाईल आणि त्यांना वर्षाला पाच लाख रुपये दिले जातील. माजी क्रीडापटूंचा अनुभव आणि प्रशिक्षणातून नवोदित खेळाडू तयार होतील, हा यामागील उद्देश आहे,’’ असे उद्‌गार केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी काढले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘खाशाबा जाधव क्रीडा संकुल’ नामकरण सोहळा, तसेच स्वामी विवेकानंद आणि पै. खाशाबा जाधव यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी खासदार गिरीश बापट, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. दीपक माने, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, सुनेत्रा पवार, रणजित जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

ठाकूर म्हणाले, ‘‘आज खेळाकडे भविष्य, करिअर म्हणून पाहिले जात आहे. देशातील पारंपारिक खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. परंतु खेळात राजकीय हस्तक्षेप नसला पाहिजे. भारताला जास्तीत-जास्त पदके मिळविण्यासाठी तयार करायला हवे. त्यासाठी केंद्र, राज्य, क्रीडा संस्था, स्वयंसेवी संस्था यांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे. क्रीडा प्रकारात उत्कृष्ट क्रीडापटूंना पुढे आणण्यात राज्य सरकारची महत्त्वाची भूमिका आहे. केंद्र सरकारने ‘खेलो इंडिया’साठी गेल्यावर्षी ६५७ कोटी रुपयांचे बजेट दिले होते, यंदा ९७४ कोटी रुपयांचे बजेट मान्य केले आहे.

तसेच २०१३-१४मध्ये संपूर्ण क्रीडा खात्याचे बजेट एक हजार २१९ कोटी रुपये होते, आता ते तीन हजार ६२ कोटी रुपये इतके वाढविण्यात आले आहे.’’ अमेरिकेतील एखाद्या विद्यापीठातील खेळाडू शंभरहून अधिक पदके आणतात, आपल्याकडेही या दृष्टीने विद्यापीठ स्तरावर तयारी होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पुणे विद्यापीठातील सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन ठाकूर यांनी दिले. विद्यापीठातील क्रीडा संकुल हे केवळ विद्यापीठातीलच नव्हे, तर राज्यातील, देशातील क्रीडापटूंसाठी खुले करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, असे डॉ. काळे यांनी यावेळी सांगितले.

अनुराग सिंह ठाकूर यांनी असा दिला सल्ला

- शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, राज्य अशा स्तरांवर क्रीडा स्पर्धा होणे गरजेचे

- क्रीडा संकुलाचे द्वार सर्वांसाठी खुले असावे

- खेळात राजकीय हस्तक्षेप नको

- तरूणांनी अभ्यास आणि खेळात समन्वय साधावा

स्टेडिअममध्ये कुत्र्याला घेऊन फिरणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांचा केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी घेतला समाचार ‘‘दिल्लीत भारतीय प्रशासकीय सेवेत सनदी अधिकारी असलेल्या पती-पत्नी यांनी कुत्र्याला घेऊन फिरण्यासाठी खेळाडू आणि प्रशिक्षक यांना स्टेडियमबाहेर जाण्यास भाग पडले. आणि ते दोघे कुत्र्याला घेऊन फिरत होते. परंतु दिल्ली सरकारने या अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही. अखेर केंद्र सरकारने या अधिकाऱ्यांवर कारवाई करत दोघांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली केली.’’ असेही केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction: कॅमेरॉन ग्रीनसाठी ऐतिहासिक बोली! KKR अन् CSK मध्ये जोरदार रस्सीखेच; बनला सर्वात महागडा परदेशी खेळाडू

Hasan Mushrif : ‘आम्ही केलं; आता जबाबदारी तुमची’ शेंडा पार्क वैद्यकीय नगरीत मंत्री हसन मुश्रीफ यांचा ठाम संदेश

Virat-Anushka Meet Premanand Maharaj : प्रेमानंद महाराज यांनी विराट-अनुष्काला सांगितला रावणाच्या मृत्यूनंतरचा 'तो' प्रसंग, नेमकं काय म्हणाले? वाचा...

Mumbai News: गोराईत रडार, दहिसरमध्ये विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय, गृहनिर्माण प्रकल्पांना गती

IPL 2026 Auction : गडी पेटला... सर्फराज खानने २२ चेंडूंत चोपल्या ७३ धावा, ३३१.८२ चा स्ट्राईक रेट; सेलिब्रेशन तर भन्नाटच Video Viral

SCROLL FOR NEXT