onion.jpg
onion.jpg 
पुणे

कांदा पुन्हा रडवणार 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सध्या बाजारात साठवणुकीतील कांदा विक्रीसाठी दाखल होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे मागील आठ दिवसांत कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. रविवारपासून किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचा भाव 35 ते 40 रुपयांवर पोचला आहे. 
गुलटेकडी मार्केट यार्डात पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नगर आदी भागांतून कांद्याची आवक होते. सध्या दररोज सुमारे 80 ते 100 ट्रक इतकी आवक होत आहे.घाऊक बाजारात मागील आठवड्यात 14 ते 16 रुपये कांद्याचे किलोचे भाव होते. त्यात वाढ होऊन रविवारपासून प्रतिकिलोस 18 ते 22 रुपये भाव मिळत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा भागांतील पूरस्थिती आणि त्या काळात सलग सुरू असलेल्या पावसामुळे मार्केट यार्डात कांद्याची आवक घटून भाववाढ झाली होती.
घटलेली अवाक आणि वाढलेली मागणी यामुळे मागील गुरुवारी घाऊक बाजारात प्रति किलो कांद्याचे भाव 24 रुपयांवर पोचले होते.त्यानंतर पूरस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर कांद्याची आवक सुरळीत सुरू झाली आहे. हे भाव स्थिर राहून पुढील काही दिवस कांद्याच्या भावात तेजी राहण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती कांद्याचे आडतदार राजेंद्र कोरपे आणि विलास भुजबळ यांनी दिली. 


येत्या काही दिवसांत भाव वाढणार 

पावसाळ्यात कांद्याला जादा भाव मिळण्याची शक्‍यता असल्याने पावसाळाच्या तोंडावर शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा साठवणूक करून ठेवतो. दुष्काळ तसेच पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणावर साठवणूक केली होती. त्यामुळे ऐन पावसाळ्यात कांद्याचे भाव टिकून होते. पूरस्थितीच्या काळात आवक घटल्यामुळे भावात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. नवीन लागवड केलेल्या कांद्याचे पावसाने नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या साठवणुकीतील जुन्या कांद्यावर पुरवठा होत आहे. पुढील काही दिवसांत कांद्याच्या भावात आणखी वाढ होण्याचा अंदाज कोरपे यांनी वर्तविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT