Cyber Crime
Cyber Crime 
पुणे

१२ लाख पाहिजेत? ११ हजार भरा

सकाळवृत्तसेवा

पुणे - ऑनलाइन औषध खरेदीची मागणी नोंदविल्यावर त्याच कंपनीच्या संकेतस्थळाचा संदर्भ देऊन तुम्हाला ‘लकी ड्रॉ’मध्ये मोटार मिळणार आहे, ती नको असल्यास, त्याऐवजी १२ लाख ८० हजार रुपये मिळू शकतात... फक्त तुम्ही ११ हजार रुपये भरा... असा सांगणारा कॉल येतो. सगळाच प्रकार संशयास्पद वाटतो म्हणून पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार केली जाते. त्याला उत्तर मिळते, की कॉल संशयास्पद आहे, तुमची माहिती देऊ नका. मात्र, त्या मोबाईल क्रमांकावरून अजूनही पाठपुरावा सुरू आहे अन्‌ त्याविरोधात काही कारवाईही होत नाही.

वित्तीय सल्लागार विक्रांत कुलकर्णी यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. त्यांनी ‘वनएमजी’ संकेतस्थळावर २२ ऑक्‍टोबरला सुमारे ७५० रुपयांची व्हिटॅमिनच्या औषधांची मागणी नोंदविली. त्यानंतर त्यांना औषधे मिळाली; परंतु २९ ऑक्‍टोबरला कुलकर्णी यांना कॉल आला. ‘तुम्ही मागविलेल्या औषधांना मागणी खूप आहे. साठा मर्यादित असल्यामुळे आम्ही लकी ड्रॉ काढला. त्यात तुम्ही विजयी झाला असून, तुम्हाला १२ लाख ८० हजार रुपयांची मोटार मिळणार आहे. मोटार नको असेल तर रोकड मिळेल,’ असे सांगण्यात आले. त्यांनी रोकड पाहिजे, असे सांगितल्यावर ११ हजार रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. तसेच, त्यांच्या बॅंक खात्याचेही तपशील विचारण्यास सुरवात झाली. हा प्रकार संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी कॉल बंद केला. 

या प्रकाराबाबत कुलकर्णी म्हणाले, ‘‘ऑनलाइन औषध खरेदी करणाऱ्या कंपनीकडे माझे तपशील होते. परंतु, ते या लोकांना कसे मिळाले? माझी औषध खरेदी यांना कशी समजली? त्याचा संदर्भ त्यांनी कसा दिला? हा सगळाच प्रकार फसवा आहे.’’

सायबर सेलने हात झटकले! 
कुलकर्णी यांनी याची माहिती सायबर सेलच्या उपायुक्त ज्योतिप्रियासिंह यांच्या कार्यालयात पाठविली. त्यात संबंधित मोबाईल क्रमांकाचाही समावेश होता. परंतु काही वेळातच सायबर सेलमधून हा प्रकार संशयास्पद आहे. तुम्ही तुमची माहिती देऊ नका, असे सांगणारा ई-मेल प्रत्युत्तर म्हणून आला. परंतु कुलकर्णी यांच्याकडे त्यानंतरही पाठपुरावा करणारा कॉल आला.

पोलिस म्हणतात, की लक्ष देऊ नका. परंतु या पद्धतीने अन्य नागरिकांची फसवणूक होत असेल, तर त्यांनी काय करायचे? किमान त्या मोबाईल क्रमांकाचा छडा लावून कारवाई तरी व्हायला हवी.
- विक्रांत कुलकर्णी, तक्रारदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT