padma shri award Sheetal mahajan became first Indian woman to skydive near Everest with national flag sakal
पुणे

Shital Mahajan: एव्हरेस्टजवळ राष्ट्रध्वजासह स्कायडायव्हिंगचा विक्रम! शीतल महाजन ठरल्या पहिल्या भारतीय महिला

भारतीय ध्वजासह माउंट एव्हरेस्टजवळ सर्वात उंच फ्लॅग जंप लँडिंग पूर्ण करीत असताना हा विक्रम घडत होता.

कृष्णकांत कोबल

हडपसर : पद्मश्री पुरस्कार विजेत्या स्कायडायव्हर शीतल महाजन यांनी नुकतेच (ता. ११) सर्वाधिक उंचीच्या माउंट एव्हरेस्टजवळ भारतीय ध्वजासह सर्वात उंच फ्लॅग जंप लँडिंग केले. त्यांच्या या कामगिरीमुळे त्या एव्हरेस्टजवळ राष्ट्रध्वजासह स्कायडायव्हिंग करणाऱ्या पहिल्या भारतीय तर, तीन ध्रुवांवर स्कायडायव्ह करणारी जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.

पद्मश्री महाजन यांनी माउंट एव्हरेस्ट परिसरातील सांगबोचे येथे स्कायडायव्हिंग केले. त्यानिमित्ताने त्यांनी उत्तर व दक्षिण ध्रुवानंतर माउंट एव्हरेस्ट या तिसऱ्या ध्रुवावर स्कायडायव्ह करून जगातील पहिली महिला होण्याचा मान मिळवला आहे. त्यांनी १२ हजार पाचशे फूटावरून भारतीय ध्वजासह लँडिंग केले.

भारतीय ध्वजासह माउंट एव्हरेस्टजवळ सर्वात उंच फ्लॅग जंप लँडिंग पूर्ण करीत असताना हा विक्रम घडत होता. एव्हरेस्टच्या चित्तथरारक पार्श्वभूमीवर महाजन भरारत असताना तिरंगा फडकतानाचे नयनरम्य दृष्य अनेक नागरिकांनी सोशल मिडियावरून अनुभवले.

उच्च उंचीच्या अचूकतेसाठी माउंट एव्हरेस्टच्या दिशेने अधिक जवळून उडी मारण्यासाठी त्यांना विशेष तयारी करावी लागली. उच्च उंचीवरून स्कायडायव्हिंग करण्याचा बारा वर्षांपासूनचा अनुभव असलेल्या सोबतच्या पॉल-हेन्री डी बेरे, ओमर अल्हेगेलन, वेंडी एलिझाबेथ स्मिथ व नादिया सोलोव्हिएवा सारख्या दिग्गज स्कायडायव्हिंग तज्ञांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.

नेपाळ देश गेली पंधरा वर्षांपासून दरवर्षी माऊंट एव्हरेस्टजवळ स्कायडायव्हिंगचे आयोजन करत आहे. रिलायन्स फाऊंडेशन, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे अशोक जैन, एरो क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष, खासदार राजीव प्रताप रुडी यांनी त्यांना सहकार्य केले.

"आजच्या या दिवसाची मी १६ वर्षांपासून प्रतिक्षा करीत होते. ते माझे मोठे स्वप्न होते. संयम आणि दृढनिश्चयाने स्वप्ने सत्यात उतरू शकतात याचा हा पुरावा आहे. भारतीय महिलेने एव्हरेस्ट प्रदेशात ध्वजासह स्कायडायव्हिंग पूर्ण करण्याची ही पहिलीच वेळ आणि ती महिला मी असल्याचा आनंद अद्वितीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या सहभागासाठी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी कृतज्ञ आहे.'

- पद्मश्री शीतल महाजन, स्कायडायव्हर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साध्वी बलात्कार प्रकरणातील दोषी गुरमीत राम रहीम पुन्हा तुरुंगाबाहेर; 40 दिवसांचा मिळाला पॅरोल, निवडणूक काळातच का येतो बाहेर?

Latest Maharashtra News Updates : नंदुरबारमध्ये दीड कोटी खर्चून घेतलेली बोट एम्ब्युलन्स बुडाली

Crime News : पोलिस कॉन्स्टेबलने पत्नीचा गळा कापून खून केला अन् टीव्हीवर दिली कबुली, सांगितले धक्कादायक कारण

Nagpur Temperature: उकाड्याने नागपूरकर हैराण; पारा ३५ अंशांवर, जोरदार पावसाची शक्यता कमी

Team India's Next schedule: इंग्लंड दौरा संपला, पुढे काय? टीम इंडियाच्या पुढील सर्व स्पर्धा, मालिकांचे वेळापत्रक एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT