पुणे

मुलांबरोबरच पालकांनीही जाणले अभ्यासाचे तंत्र 

सकाळवृत्तसेवा

मुंढवा : दहावीचा बदललेला अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीतील बदल याबद्दल विद्यार्थी पालक व शिक्षकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी "सकाळ'ने वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या मनात अभ्यासक्रमाविषयी असलेल्या शंका दूर झाल्या. मुलांकडून अभ्यास कसा करून घ्यावा, याचे तंत्रही पालकांना समजले. 

डॉ. सुनील मगर, संचालक बालभारती 

- यापूर्वी ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जायचे; परंतु विद्यार्थ्याला राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करता यावी म्हणून नव्या अभ्यासक्रमाची रचना केली आहे. 
- पालकांनी अभ्यास करण्याविषयी मुलांवर कोणताही दबाव आणू नये. 
- पूर्वी शाळेकडून 20 गुण विद्यार्थ्यांना दिले जायचे. ती पद्धत आता बंद करण्यात आली आहे. 
- पालक-विद्यार्थ्यांनी दहावीची भीती मनात बाळगू नये 
- काळाच्या आवश्‍यकतेनुसार अभ्यासक्रम तयार केला आहे. 

उमेश प्रधान, शिक्षणतज्ञ 

- मुलांचे स्वप्न तेच पालकांचे असले पाहिजे. आपल्या अपेक्षांचे ओझे त्यांवर लादू नये. 
- पूर्वी प्रश्नपत्रिका होती. नवीन अभ्यसक्रमानुसार त्याऐवजी ती कृतिपत्रिका झाली. प्रश्नांची जागा तिने घेतली आहे. - पूर्वीप्रमाणे यात पाठांतराला वाव नाही. यात उत्तरांची विविधता आहे. त्याचा उपयोग करण्यासाठी "सकाळ' वर्तमानपत्रात येणारी विविध सदरे वाचावीत. 
- विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. 

- प्राजक्ती गोखले, गणिततज्ज्ञ 

- नवीन अभ्यासक्रमात गणित विषयाचे फायनांशियल मॅपिंग केले आहे. 
- दहावीत जीएसटी असला तरी कोणत्या वस्तूवर किती कर लागू आहे, हे अपेक्षित नाही. 
- केवळ जीएसटीची ओळख होऊन शेकडेवारीचे गणित अपेक्षित आहे. 
- कन्सेप्ट मॅपिंगला विशेष महत्त्व आहे. 
- मुलांनी गणिताचे पुस्तक वाचावे. सरावासाठी त्यात व्हिडीओ जोडले आहेत. गणिताचा सराव करावा. 

कृष्णा उपाळकर (विद्यार्थी) ः नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका यामुळे मनात संभ्रम निर्माण झाला होता. आज "सकाळ'ने केलेल्या मार्गदर्शनामुळे मनाला भेडसावणारे प्रश्न दूर होण्यास मदतच झाली. त्यामुळे मार्गदर्शनाप्रमाणे अभ्यास केल्यास गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. 

दीपाली कवडे (पालक) ः "सकाळ'ने आयोजित केलेल्या दहावीचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा चांगली होती. "सकाळ' नागरिकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर योग्य उपाय शोधत असतो व त्याचा पाठपुरावा करून ते पूर्णही करतो. त्याचप्रमाणे दहावीच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित कार्यशाळेत मुलांना मार्गदर्शन करून अभ्यासाच्या नियोजनाविषयी चांगली माहिती दिली. 

संजीव यादव (उपप्राचार्य) ः विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून गणित व इंग्रजी या विषयाची भीती मुले बोलून दाखवत होती; परंतु या कार्यशाळेमुळे मुलांनी मनातील भीती दूर झाल्याचे मला सांगितले. "सकाळ'चे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी मोलाचे ठरले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT