‘फोटो कट्टा’द्वारे आयोजित प्रदर्शनातील छायाचित्र.
‘फोटो कट्टा’द्वारे आयोजित प्रदर्शनातील छायाचित्र. 
पुणे

अनोख्या पर्यटनस्थळांची घ्या धावती भेट

सकाळवृत्तसेवा

पुणे - पर्यटकांचे फारसे लक्ष न गेलेल्या अनोख्या पर्यटनस्थळाचे दर्शन छायाचित्रांच्या माध्यमातून घेणेही कमालीचा आनंद देणारे ठरते.

‘फोटो कट्टा’द्वारे आयोजित या प्रदर्शनातील छायाचित्रांमधून रमणीय निसर्गसौंदर्य व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांची धावती भेट घडते.
विविध देशांमधील निसर्गाचे नेत्रदीपक रूप छायाचित्रांच्या माध्यमातून पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कलादालनात हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. आजपासून ते रविवारपर्यंत (ता. १७) सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुल्या असणाऱ्या या प्रदर्शनात तब्बल १७० छायाचित्रांमधून दृश्‍य स्वरूपातील भटकंतीची मौज अनुभवायला मिळेल.

या प्रदर्शनात मांडलेल्या छायाचित्रांमधून केनिया-टांझानियातील वन्यजीव भेटीला आले आहेत. तसेच युरोपमधील क्रोएशिया, स्लॉवेनिया, पोलंड, हंगेरी, झेक रिपब्लिकची सहल घडते. आइसलॅंड या वेगळ्याच परिसराशी दृष्टिभेट होते. नॉदर्न लाइटस्‌, मिठाच्या खाणीतील स्फटिकाचे झुंबर, धबधबे, तलाव, डोंगरकडे, विविधरंगी खडक पाहताना मन हरखून जाते. अनेक छायाचित्रे तर पेंटिंग असल्यासारखी वाटतात. वन्यजीवांच्या विविध मुद्रा व लोकजीवनाच्या छटा बघत राहाव्याशा वाटतात.

याबाबत आयोजक आत्माराम परब म्हणाले, ‘देशोदेशी फारशा न मळलेल्या वाटांवरून फिरत तिथली दृश्‍ये छायाचित्रांमधून जतन करण्याचा मला छंद होताच. यातूनच इतरांना पर्यटनाला नेण्याची इच्छा निर्माण झाली.

माझ्याबरोबर येणाऱ्या व आपापल्या परीने निरनिराळ्या ठिकाणी फिरस्ती करणाऱ्या हौशी मंडळींच्या छायाचित्रांची प्रदर्शने भरवू लागलो. मुंबई, पुणे, गोवा, नाशिक, रत्नागिरी यांसारख्या शहरांमध्ये आतापर्यंत सुमारे तीस प्रदर्शने आयोजित केली आहेत. यात १२ वर्षांच्या मुला-मुलींपासून ते आजी-आजोबांनी काढलेल्या छायाचित्रांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT