Sudhir Toradmal
Sudhir Toradmal 
पुणे

जीवनात शिस्त खूप महत्त्वाची: पोलिस निरीक्षक तोरडमल

निलेश कांकरिया

वाघोली : जीवनात शिस्त खूप महत्त्वाची आहे. तुमच्या जीवनाला त्यामुळे एक वेगळी वाट मिळते. महाविद्यालयीन जीवनात त्याचे महत्त्व वाटत नसले तरी येथून बाहेर पडल्यावर त्याचे महत्व कळेल. त्यामुळे शिस्त आतापासूनच अंगीकृत करा, असे मत सहायक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी व्यक्त केले.

वाघोलीतील जी एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित " संकुलातील शिस्त "या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी संकुलाचे उपसंचालक डॉ प्रशांत नगरनाईके,  रजिस्ट्रार दत्तात्रय घोगरे, डॉ आर व्ही सूर्यवंशी, अमित वाघ,नितीन चौधरी, अमित कर्णावट , मधुसूदन वरुटे,  मानसी जोशी उपस्थित होते.

‎तोरडमल पुढे म्हणाले, आपल्या शिक्षणामागे आई वडिलांचे कष्ट असतात. आपण आपले संस्कार जपले पाहिजे. शिस्त जीवनाचा अविभाज्य घटक आहे. ती ठेवलीच पाहिजे. शिस्त आपल्यासाठीच असते. मित्र कसे असावेत हे आपणच ठरवले पाहिजे. यशाच्या पायरीत पहिला घटक मित्र आहे. फक्त परीक्षा देऊन पास होणे म्हणजे गुणवत्ता नाही. स्पर्धात्मक जीवन आहे. आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. जीवनात यशवी होण्यासाठी गुणवत्ता ,कल्पकता पाहिजे. आपल्यातील वेगळे पणा दाखवून द्या. शिक्षणाचे सोने करा. यश पाहिजे असेल तर अभ्यासाकडे लक्ष द्या. कॉलेजचा एकही विद्यार्थी शिस्त तोडताना दिसू नये. ती तोडल्यास गय केली जाणार नाही. कोणत्याही बाबतीत पोलीसात गुन्हा दाखल झाल्यास तुमचे आयुष्य बरबाद होईल. रॅगिंग मुळे मुलांचे आयुष्य बरबाद होते. त्यामुळे असा प्रकार करू नका. आई वडिलांचा कायम विचार करा. प्रत्येक समस्येवर तोडगा आहे. भलते सलते विचार डोक्यात आणू नये. असे आवाहनही तोरडमल यांनी केले. यावेळी निखिल घोडके या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT