pimpri chinchwad
pimpri chinchwad 
पुणे

पिंपरी-चिंचवडचा महापौर बिनविरोध?

उत्तम कुटे

पिंपरी : जनतेचा कौल मान्य करीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील मावळते सत्ताधारी 'राष्ट्रवादी'ने तेथील महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 14 तारखेची ही प्रतिष्ठेची आणि शहराच्या पहिल्या नागरिकाची निवड बिनविरोध होण्याचे संकेत मिळाले आहेत. तर, उद्योगनगरीतील विरोधी पक्षनेतेपदी आणि पालिकेतील राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी आक्रमकता आणि अनुभव जमेस धरला जाणार असून त्या कसोटीवर माजी महापौर योगेश बहल आणि मंगला कदम उतरत असल्याने त्यापैकीच एकाची निवड होण्याची दाट शक्‍यता आहे. 

कदम याच मावळत्या सभागृहात पक्षाच्या गटनेत्या होत्या. त्यामुळे त्यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली, तर आपोआप त्या पुन्हा पक्षाच्या पालिकेतील गटनेत्याही होणार आहेत. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत, तर राष्ट्रवादीला विरोधात बसण्याचा कौल जनतेने दिला आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत न उतरण्याचे संकेत पक्षाचे नेते अजित पवार यांनी काल (ता.5) पुणे येथील नगरसेवकांच्या बैठकीत दिले. त्याला या बैठकीला उपस्थित असलेल्या कदम यांनीही दुजोरा दिला. या दोन्ही पदांसाठी पक्ष उमेदवार देणार नसल्याचे त्यांनी सोमवारी (ता.6) 'सकाळ'ला सांगितले.


भाजपनंतर राष्ट्रवादीलाच सर्वाधिक जागा मिळाल्या असून तेच महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवार देणार नसल्याने तिसऱ्या क्रमांकांवरील शिवसेना नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर ते देण्याची अजिबात शक्‍यता नाही. नऊ जागा असलेल्या शिवसेनेला मुंबई तसेच ठाण्यातही भाजपने 'बाय' दिला असल्याने आता इथे ते मित्र झालेल्या भाजपला नडण्याची अजिबात शक्‍यता नाही. त्यामुळे भाजपचा येथील आणि पुण्यातील महापौर आणि उपमहापौरही बिनविरोध निवडला जाण्याची शक्‍यता सर्वाधिक आहे. पुण्यातील या दोन्ही पदांचे उमेदवार जाहीर झाले असून आता पिंपरी-चिंचवडमध्ये ते होणे बाकी असल्याने त्यासाठीची उत्सुकता काहीशी ताणली गेली आहे.

आता दादांऐवजी भाऊंचा महापौर
पूर्वी अजित पवार तथा दादा म्हणतील तोच महापौर पिंपरी-चिंचवड आणि पुणे येथे होत होता. आता, मात्र तो भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप तथा भाऊ यांच्या मर्जीतील होणार आहे. याच पक्षाचे भोसरीचे आमदार महेश लांडगे तथा शहराचे दुसरे दादा यांनीही त्यासाठी जोर लावला आहे. मात्र, त्यांना राज्यमंत्रिपद दिले जाण्याची शक्‍यता असल्याने ते महापौरपदासाठी आपल्या समर्थकालाच बसविण्याकरिता अधिक आग्रही राहणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. 

विरोधी नेतेपदी कदम? 

मावळत्या सभागृहात कदम, विरोधी पक्षातील सीमा सावळे आणि सुलभा उबाळे यांचा 'आव्वाज' राहिला. तिघीही आक्रमकपणे आपले म्हणणे मांडण्यात पटाईत आहेत. त्यातील सावळे या आता सत्ताधारी बाकावर गेल्या असून उबाळे यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपला पुरून उरण्यासाठी आक्रमक अशा आणि चौथ्यांदा निवडून आलेल्या कदम यांना संधी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. बहल हे सहाव्यांदा निवडून आले असले, तरी पक्षबांधणी आणि वाढीचे काम आणि भविष्यात यापेक्षा अधिक मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाण्याची शक्‍यता आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT