Plantation campaign Forest Department Sayaji Shinde 
पुणे

नामशेष प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी वनस्पती बँक आवश्यक : सयाजी शिंदे

वनसंवर्धन दिनानिमित्त वन विभागाच्यावतीने विविध आयोजित वृक्षारोपण मोहीम शिंदे यांच्या हस्ते पार पडली

अक्षता पवार

पुणे - पश्चिम घाटात असे कित्येक वनस्पती आहेत जे नामशेष होत आहेत. अशा सर्व वनस्‍पतींचे संवर्धन करण्यासाठी त्यांची रोपे तयार करून वनस्पती बँक तयार करण्याची गरज आहे, असे मत सह्याद्री देवराई प्रकल्पाचे संस्थापक व अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्‍त केले.

वनसंवर्धन दिनानिमित्त वन विभागाच्यावतीने विविध आयोजित वृक्षारोपण मोहीम शिंदे यांच्या हस्ते पार पडली. यावेळी पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, पौड (मुळशी) वन परिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, वनसंरक्षक दीपक पवार, आशुतोष शेंडगे, वनपाल मल्लिनाथ हिरेमठ, संजय अहिरराव, वनरक्षक सोनाली राठोड, सारिका दराडे आदी उपस्थित होते. यावेळी वनसंरक्षक मयूर बोठे यांच्या मार्गदर्शनाखाली पौड वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या प्रांगणात ताम्हन, कडुनिंब, करंज, शिसू , काटेसावर, चिंच,सीताफळ, आदी देशी प्रजातींची रोपे लावण्यात आले. तसेच पर्यावरण जनजागृतीचा भाग म्हणून ‘भरे रोपवाटिका’ येथे रोपे देण्यात आली. तर, भरे गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना या रोपांची माहिती देण्यात आली.

यावेळी शिंदे म्हणाले, ‘‘देशी प्रजातींची झाडे मोठ्या प्रमाणात लावण्याची तसेच त्यांच्या संवर्धनाची गरज आहे. ही झाडे वाचली तरच, पर्यावरण वाचेल. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.’’

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे अनुषंगाने १५ ऑगस्ट रोजी संयुक्त वन व्यवस्थापन समितींच्या माध्यमातून ७० वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या ७५ व्यक्तींचा दुर्मिळ वृक्ष प्रजाती भेट देऊन सन्मान केला जाईल. यामुळे झाडाला घरातील व्यक्ती समजून वृक्षासंबंधी भावनिक नाते तयार होण्यास मदत होईल असे यावेळी पाटील यांनी सांगितले.

‘‘सध्या भरे रोपवाटिकेत ३३ प्रकारच्या देशी प्रजाती तयार करण्यात आलेल्या असून चालू वर्षात ७५ प्रकारच्या देशी प्रजाती तयार केल्या जाणार आहेत. वनमहोत्सव अंतर्गत शासकीय यंत्रणा यांना मोफत रोपे पुरवठा केला जात असून वृक्षप्रेमी, शेतकरी यांना सवलतीच्या दराने रोपे पुरवठा केला जात आहे.’’

- संतोष चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, पौड (मुळशी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT