Sultanpur Bhandara dam
Sultanpur Bhandara dam sakal
पुणे

मंचर शहरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल

डी.के वळसे पाटील

मंचर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन सात हजार ५०० नळ कनेक्शनद्वारे दररोज ४० ते ४५ लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो.

मंचर - 'मंचर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुलतानपूर (ता. आंबेगाव) येथे घोडनदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे ढापे दुरुस्तीसाठी काढून टाकले आहेत. पाणी वाहून गेल्याने बंधारा व नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहीरीने तळ गाठला आहे. त्यामुळे मंचर शहराला होणारा पाणीपुरवठा बंद झाल्याने गुरुवारी (ता. ७) व शुक्रवारी (ता. ८) पिण्याच्या पाण्यासाठी ऐन पावसाळ्यात नागरिकांचे हाल झाले.

दरम्यान पाटबंधारे विभागाने नळ योजनेच्या विहीरीत पाणी साठा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरु केल्यामुळे शनिवारी (ता. ९) पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी व्यक्त केली आहे.

मंचर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन सात हजार ५०० नळ कनेक्शनद्वारे दररोज ४० ते ४५ लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. ऐन उन्हाळ्यात एप्रिल, मे व जून महिन्यात हुतात्मा बाबू गेनू जलाशयातून (डिंभे धरण) घोड नदीत पाणी सोडले होते. सुलतानपूर बंधाऱ्यातील पाणीसाठा टिकून राहण्यास मदत झाली.त्यामुळे मंचरकरांना पाणी उपलब्ध झाले होते.

'पाटबंधारे खात्याने सुलतानपूर बंधाऱ्यातील ढापे दुरुस्तीबाबत कुठलीही पूर्व सूचना मंचर नगरपंचायतीला दिली नाही. अचानकपणे बंधाऱ्यातील पाणी वाहून गेल्याने व विहिरीने तळ गाठल्याने नळ योजना बंद ठेवावी लागली. विहिरीतील पाण्याच्या व्यवस्थेसाठी कुकडी पाट बंधारे उपविभागक्रमांक तीनचे उपअभियंता दत्ता कोकणे यांच्या बरोबर चर्चा झाली आहे.'

- मनोज पष्टे, मुख्याधिकारी, मंचर नगरपंचायत.

'सुलतानपूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे ढापे जीर्ण झाले होते. पुराच्या पाण्यात ढापे वाहून गेले असते. हा धोका टाळण्यासाठी ढापे दुरुस्ती व बदलणे गरजेचे होते. श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) बंधाऱ्यातून मंचर नळ पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीला पाणी उपलब्ध करण्याचे काम सुरु आहे. शुक्रवार (ता. ८) रात्रीपर्यंत विहीरीत पुरेश्या प्रमाणात पाणी साठा होईल. त्या दृष्टीने कामकाज सुरु आहे.'

- दत्ता कोकणे, उपअभियंता, कुकडी पाट बंधारे उपविभाग क्रमांक तीन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT