बुधवार पेठ - लालमहाल ते फुटका बुरूज चौकादरम्यानच्या असलेल्या झाडाच्या धोकादायक फांद्या.
बुधवार पेठ - लालमहाल ते फुटका बुरूज चौकादरम्यानच्या असलेल्या झाडाच्या धोकादायक फांद्या. 
पुणे

#PMCIssue : सार्वजनिक ठिकाणी मोफत; ‘खासगी’ला शुल्क

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या 
पावसामुळे झाडांच्या धोकादायक झालेल्या फांद्यांच्या छाटणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या फांद्या पडून अपघात होत असून, त्यात वाहनांचे नुकसानही होत असल्याने याबाबतचे धोरण तयार करण्याचे वृक्ष प्राधिकरणाने ठरविले असून, फांद्यांच्या छाटणीसाठी किमान १५ ठेकेदारही नियुक्त करण्यात येणार आहेत.

मात्र, त्यासाठी अजून एक महिना लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मोफत तर खाजगीसाठी शुल्‍क आकारण्यात येणार आहे.

सततच्या पावसामुळे अनेक झाडांच्या फांद्या धोकादायक झाल्या आहेत. काही ठिकाणी झाडे कुजली असून ती पडत आहेत. याबाबत महापालिकेने संबंधित क्षेत्रीय कार्यालय प्रमुखांना छाटणीचे अधिकार दिले आहेत; परंतु नागरिकांनी अर्ज केल्यावर संबंधित ठेकेदार त्यासाठी पैसे मागत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक ठिकाणच्या झाडांच्या फाद्यांच्या छाटणीसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत; तर खासगी जागेतील झाडांच्या फांद्यांच्या छाटणीसाठी पैसे द्यावे लागतील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. 

कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी; तसेच रस्त्यांवर झाडांच्या फांद्या धोकादायक झाल्या आहेत, असे नागरिकांनी निर्दशनास आणून दिल्यास महापालिकेच्या त्या भागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून त्या झाडांची छाटणी केली जाते. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. 

एखाद्या सोसायटीच्या आवारातील झाडांच्या फांद्यांची छाटणी करायची असल्यास त्या भागातील क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांनी अर्ज करायचा आहे. तेथील वृक्ष अधिकारी पाहणी करून नागरिकांना परवानगी देतात. त्यानुसार नागरिकांनी स्वखर्चाने छाटणी करून घ्यायची आहे. 

छाटणीसाठी ठेकेदार हवा असल्यास महापालिकेच्या उद्यान विभागातून त्यासाठी संपर्क क्रमांक दिला जातो, अशी माहिती महापालिकेचे सहआयुक्त सुरेश जगताप यांनी दिली.

४१ लाख शहरातील झाडे
१५ क्षेत्रीय कार्यालये 
२०० महिन्यात पावसाने पडलेली झाडे (अंदाजे)
३ हजार फांद्या छाटणीसाठी प्रलंबित अर्ज 

वृक्षछाटणीसाठी ठेकेदार शहरात नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महिनाभरात ती पूर्ण होईल, तसेच याबाबत धोरणही तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच ती पूर्ण होईल. 
- गणेश सोनुणे, सदस्य सचिव, वृक्ष प्राधिकरण

 वृक्षछाटणी नियमितपणे होणे गरजेचे आहे. त्यासाठीचे निश्‍चित धोरण समिती तयार करणार आहे. प्राधिकरणाच्या बैठकीत त्याची प्रक्रिया सुरू करून नागरिकांच्या सूचनांचाही अंतर्भाव करू.
- संदीप काळे, सदस्य, वृक्ष प्राधिकरण समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT