pmc program ajit pawar chandrakant patil one stage statements
pmc program ajit pawar chandrakant patil one stage statements 
पुणे

'दादा तुम्हीच मुख्यमंत्री'; चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना टोला

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या एव्हीएशन गॅलरीचे उद्घाटन आज भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मारलेल्या कोपरखळ्यांमुळं या कार्यक्रमात राजकीय धुळवड अनुभवायला मिळाली. जोपर्यंत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहे, तोपर्यंत पुण्याच्या विकासासाठी अजिबात राजकारण करणार नाही, असा शब्द अजित पवार यांनी यावेळी दिला. 

काय म्हणाले अजित पवार?
अजित पवारांचं भाषण सुरू असताना त्यांनी पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजला परवानगी दिल्याचं जाहीर केली. त्यावेळी उपस्थितांमधून एकानं 'एकच वादा, अजितदादा', अशी घोषणा दिली. त्या वेळी अजित पवारांनी महापालिकेच्या निवडणुकीवेळी कुठं गेला होतास, असं म्हणताच हशा पिकवला. अजित पवार भाषणासाठी माईक जवळ पोहचताच माईक आणि डायस खाली पडला. विशेष म्हणजे याच डायसवरून चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेकांची भाषणं झाली. मात्र, नेमके अजित पवार बोलायला उभे राहिले आणि डायसचा एक भाग खाली पडायला लागला. त्यामुळं अजित पवारांना स्टेजवर दुसऱ्या बाजूला असलेल्या डायसवर जाऊन भाषण करावं लागलं.  भाषणाला सुरुवात करताच अजित पवारांनी 'महापौरांनी मुद्दाम असं केलं नाही ना,' असं गमतीनं म्हटलं. कोरोना व्हायरसबद्दल काळजी घेण्याची गरज, असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. कोरोनाचा धोका निर्माण झालेला असताना, काही जण खालच्या पातळीवर जाऊन पैसे कमावतायत.  भिवंडीमध्ये जे झालं, त्याची चौकशी करायला सांगितली असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. अजित पवार म्हणाले, 'पंगत बसलीय. मी वाढपी आहे. त्यामुळे आधी आमदारांना खूष करून टाकलं. प्रत्येकजण आपल्या जिल्ह्याला झुकतं माप देत असतो. चंद्रकांत पाटील देखील आधी कोल्हापूरला झुकतं माप देत असत.', असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ►क्लिक करा

'दादा तुम्हीच मुख्यमंत्री'
अजित पवार याचं भाषण तर रंगतदार झालच. पण, चंद्रकांत पाटील यांनी भाषणात जोरदार बॅटिंग केली. ते म्हणाले, 'दादा तसे प्रेमळ आहेत फक्त रागीट वाटतात. प्रत्येक जिल्ह्याला एक छोटं का होईना विमानतळ असलं पाहिजे. सगळे नियम पूर्ण करणारे एक हेलिपॅड प्रत्येक जिल्ह्यात असलं पाहिजे.' अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. त्याचवेळी तुम्हाला मुख्यमंत्र्यांशी बोलायची गरज नाही कारण तुम्हीच मुख्यमंत्री आहात, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना लगावला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ►क्लिक करा

'मनसेसोबत तोपर्यंत युती नाही'
'मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे, त्याबद्दल त्यांचे स्वागत. पण, जोपर्यंत ते त्यांची परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाहीत. तोपर्यंत मनसेसोबत जाण्याचा प्रश्नच नाही. आशिष शेलार आणि राज ठाकरे हे जुने मित्र असल्यानं नेहमीच भेटत असतात. त्यामुळं महापालिका निवडणुकीत एकत्र येऊ असं नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT