PMP BUS Pune Darshan
PMP BUS Pune Darshan 
पुणे

#PuneDarshan  ‘पीएमपी’च्या ‘पुणे दर्शन’ सेवेला घरघर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील वारसा व पर्यटनस्थळे पर्यटकांना एकाच फेरीत बघता यावीत, या उद्देशाने सुमारे २५ वर्षांपूर्वी पीएमपीने ‘पुणे दर्शन’ सेवा सुरू केली. मात्र, अलिकडे पर्यटकांनी या सेवेकडे पाठ फिरवल्याने सध्या केवळ एकच बस धावत आहे. 

पर्यटनासाठी पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना एकाच दिवसात शहरातील मंदिरे, वाडे, उद्याने, संग्रहालये, ऐतिहासिक वास्तू अशी विविध १३ स्थळे ‘पुणे दर्शन’च्या माध्यमातून बघता येतात. त्यासाठी पीएमपीने दोन वातानुकुलित बसची व्यवस्था केली आहे. पुणे स्टेशन व डेक्कन अशा दोन ठिकाणांवरून सुटणाऱ्या या बस सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत पर्यटकांना ‘पुणे दर्शन’ घडवितात. या बसमध्ये एक गाइड असतो, जो सर्व स्थळांची माहिती पर्यटकांना देतो. 

या पूर्वनियोजित स्थळांव्यतिरिक्त पर्यटकांना शहर परिसरातील ठिकाणी जायचे असल्यास पीएमपीकडून सहलींचे आयोजन केले जाते. यात सिंहगड, बनेश्‍वर, आळंदी यांसह अनेक ठिकाणांचा समावेश आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी ही सुविधा नुकतीच अद्ययावत करण्यात आली आहे. सण व सुट्यांच्या दिवशी भरभरून प्रतिसाद लाभणाऱ्या या सेवेकडे इतर दिवशी मात्र, पर्यटक कमी प्रमाणात फिरकत आहेत. त्यामुळे या सेवेला घरघर लागली आहे.

‘पुणे दर्शन’चा प्रतिसाद वाढविण्यासाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पर्यटकांच्या मागणीनुसार सहलींचे नियोजन करून देत आहोत. तरीही अपेक्षित प्रतिसाद नाही.
-सुनील गवळी, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

Latest Marathi News Live Update : 'अशा बिनकामाच्या गोष्टींवर मोदी नक्कीच बोलतील..'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याबाबत प्रियांका गांधींची प्रतिक्रिया

Game Of Thrones : लॅनिस्टर गादीचा वारस हरपला.. 'गेम ऑफ थ्रोन्स' मधील 'या' कलाकाराचं निधन; पार्टनरची पोस्ट चर्चेत

Sushma Andhare : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अंधारे करणार तक्रार; प्रचार सभेतील भाषणावर घेतला आक्षेप

SCROLL FOR NEXT