PMP-Business-Plan
PMP-Business-Plan 
पुणे

#PMPBusinessPlan पीएमपी प्रवाशांना मिळणार दर्जेदार सुविधा; 'बिझनेस प्लॅन' तयार

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांना अधिकाधिक सुविधा कशा देता येतील, पीएमपीच्या उत्पन्नाचे स्रोत कसे वाढविता येतील, बसच्या देखभाल-दुरुस्तीचे नियोजन डेपोनिहाय कसे करता येईल, मनुष्यबळाचा वापर योग्य पद्धतीने कसा करता येईल आदींबाबत मार्गदर्शक ठरेल असा पुढील पाच वर्षांसाठीचा ‘बिझनेस प्लॅन’ पीएमपीने तयार केला आहे. महिनाभरात त्याचे संचालक मंडळाला सादरीकरण होणार. त्यानंतर लगेचच अंमलबजावणीला सुरवात होणार आहे.

पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांच्यासमोर बिझनेस प्लॅनचे सादरीकरण झाले. ‘अर्नेस्ट आणि यंग’ (ई अँड वाय) या कंपनीने तो तयार केला आहे. पीएमपीने त्यात काही सुधारणा सुचविल्या आहेत. त्यानंतर महिनाभरात अंतिम आराखडा सादर करणार असल्याचे चारठणकर यांनी सांगितले.

महापालिका, स्मार्ट सिटी, मेट्रो, विमानतळ प्रशासन, एसटी महामंडळाशीही हा प्लॅन तयार करताना चर्चा केली आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांचा अंतर्भाव प्लॅनमध्ये केला आहे. तसेच संचालक मंडळाने मंजुरी दिल्यावर या आराखड्याची अंमलबजावणी करणार आहे. सुमारे दोनशे पानांचा हा प्लॅन आहे. 

सुमारे ११ लाख प्रवाशांची रोज वाहतूक करणाऱ्या पीएमपीने बिझनेस प्लॅन तयार करावा, अशी मागणी अनेक स्वयंसेवी संस्था करीत होत्या. ‘परिसर’ संस्थेने याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानंतर केंद्र सरकारच्या योजनेतून महापालिकेने हा प्लॅन तयार करण्यासाठी आर्थिक साह्य केले.

बिझनेस प्लॅन पीएमपीकडे आला आहे. महापालिकेच्या सर्वंकष वाहतूक आराखड्याशी (सीएमपी) हा प्लॅन इंटिग्रेटेड असावा, असे पीएमपीचे म्हणणे आहे. त्यासाठीच्या सूचना केल्या आहेत. अन्य शासकीय विभागांशी चर्चा करून महिन्यात अंतिम प्लॅन संचालक मंडळाला सादर होईल. 
- अजय चारठणकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

बिझनेस प्लॅन तयार झाला, ही चांगली बाब आहे. परंतु, तो अंतिम करण्यापूर्वी समितीसमोर सादरीकरण व्हायला हवे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनीही त्याबाबत सूचना केली आहे. हा प्लॅन बघून आवश्‍यक असेल तर, काही सुधारणाही सुचविता येतील. 
- सुजित पटवर्धन, परिसर संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT