PMP-Bus
PMP-Bus 
पुणे

‘पीएमपी’चे एका दिवसात १ कोटी ७९ लाख उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा

पुणे - दिवाळीच्या सुटीनंतर सुरू झालेल्या शाळा, बाहरेगावी गेलेले नागरिक परत आल्याने पीएमपीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. सोमवारी (ता.४) पीएमपीला एका दिवसामध्ये एक कोटी ७९ लाख ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागील काही महिन्यांतील हे उच्चांकी उत्पन्न असल्याचे सांगितले जात आहे.

शहरात सार्वजनिक वाहतूक देणाऱ्या पीएमपीला प्रवाशांची घटती संख्या, ब्रेककडाऊन, जुन्या गाड्या यामुळे घरघर लागल्याचे चित्र आहे. याचा परिणाम त्यांच्या उत्पन्नावरदेखील होत आहे. मात्र, दिवाळीच्या सुट्या संपल्याने शहरातील शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. तर, सुट्ट्यांनिमित्त गावी गेलेले नागरिक शहरात परत आल्याने प्रवासीसंख्येत वाढ झाली आहे.

परिणामी, पीएमपी प्रशासनाला चांगले उत्पन्न मिळाले आहे. दर दिवशी पीएमपी आणि भाडेतत्त्वावरील मिळून सुमारे १४०० ते १५०० बस मार्गावर धावतात. त्यांच्या माध्यमातून पीएमपीला दीड कोटीच्या आसपास उत्पन्न मिळते. मात्र, सोमवारी वाढत्या प्रवासीसंख्येमुळे पीएमपीला १ कोटी ७९ लाख ९० हजार एवढे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती पीएमपी अधिकाऱ्याने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT