पुणे

पीएमपीच्या ‘आयटीएमएस’ला घरघर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बसने किती किलोमीटर वाहतूक केली, किती स्टॉपवर बस थांबली, चालकाने किती वेळा जोरात ब्रेक दाबला आदी विविध प्रकारची माहिती देणारी पीएमपीमधील ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ला (आयटीएमएस) घरघर लागली आहे. या सिस्टीममध्ये सुधारणा झाली नाही, तर ती बंद करण्याचा इशारा पीएमपी प्रशासनाने संबंधित कंपनीला दिला आहे. संगणकीय आणि प्रत्यक्षातील माहितीमध्ये विसंगती आढळल्यामुळे पीएमपीने तिसऱ्यांदा हा इशारा दिला आहे. 

पीएमपीमध्ये ‘आयटीएमएस’ सिस्टीम कार्यान्वित करण्यासाठी ‘एनईसी’ या कंपनीला एप्रिल २००१५ मध्ये सुमारे ५२ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. पीएमपीच्या ७९० बसमध्ये ‘जीपीएस’ बसविणे, बीआरटी मार्गांवरील ९४ थांब्यांवर एलईडी स्क्रीन उभारणे, कंट्रोल रूमला ही यंत्रणा जोडणे, बसच्या वाहतुकीची नोंद घेणे, बसचालकाने थांब्यांवर बस उभी न केल्यास त्याबाबत नोंद घेणे आदींचा समावेश ‘आयटीएमएस’मध्ये आहे. बसमधील प्रवाशांना पुढील थांबा कोणता तसेच थांब्यांवरील प्रवाशांना मार्गावरील  बस कधी येणार, याची माहिती थांब्यावरील एलईडी स्क्रीनमध्ये मिळणे अपेक्षित होते. परंतु, विविध कारणांमुळे २२ मार्चपासून बीआरटी मार्गांवरील ही यंत्रणा बंद पडली आहे. तसेच ‘आयटीएमएस’मध्ये नोंद झालेली माहिती आणि प्रत्यक्षातील माहिती, यामध्येही विसंगती निर्माण झाली आहे.

पावणेदोन कोटी रुपयांचा दंड
‘आयटीएमएस’मधील विसंगतीबद्दल पीएमपी प्रशासनाने गेल्या काही महिन्यांत एनईसी कंपनीला सातत्याने दरमहा १० ते १५ लाख रुपये दंड केला आहे. गेल्या दोन वर्षांत या कंपनीला एकूण एक कोटी ७५ लाख रुपयांचा दंड झाला आहे. एनईसीने बसविलेल्या यंत्रणेत सुधारणा व्हाव्यात म्हणून पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे, सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांनी यापूर्वी दोन वेळा त्यांना ‘कारणे दाखवा’ बजाविल्या आहेत. परंतु, सुधारणा होत नसल्यामुळे आता कंत्राट रद्द करण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती पीएमपीच्या सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Labour Day : कामगार दिन! प्रत्येकाला माहिती असायला हवे असे भारतातील 11 कायदे

Satara Lok Sabha : शरद पवारच माझे मुख्य प्रचारक; असं का म्हणाले खासदार उदयनराजे?

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT