आळंदी, ता. २३ : दारूच्या नशेत शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तणूक करणाऱ्या चौघांवर आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महादेव गोविंद पानबोले, नितीन विठ्ठल गायकवाड (दोघेही रा. चऱ्होली खुर्द), सुनील संजय सरकटे आणि गंगाधर जगन्नाथ चन्ने (दोघेही रा. आळंदी घाट) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
इंद्रायणी नदी घाट प्रदक्षिणा रस्ता चाकण चौक ते देहू फाटा या भागात मद्यपींचा असलेला उपद्रव पाहता आळंदी पोलिसांनी दारू पिऊन रस्त्यावर गोंधळ करणाऱ्यांवर आता बडगा उगारला आहे. ही कारवाई आळंदी पोलिसांनी शुक्रवारी (ता. २१) आळंदी गावठाण हद्दीतील चावडी चौक परिसर आणि आळंदी-मरकळ रस्त्यावर केली. याबाबत फिर्याद पोलिस शिपाई हरिराम डुमनर, अमित अनिल ढीखले आणि नारायण धनाजी सूर्यवंशी यांनी आळंदी पोलिस ठाण्यात दिली आहे. नुकतेच चार दिवसांपूर्वी आळंदीतील प्रदक्षिणा रस्त्यावर हॉटेलच्या पुढे ओट्यावर रात्रीच्या सुमारास एका मद्यपीचा खून झाला होता. यामुळे शहरात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर बेवारस राहणाऱ्या घाटावरील मद्यपींवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.