police arrested cable thieves of agricultural vehicles crime pune junnar
police arrested cable thieves of agricultural vehicles crime pune junnar sakal
पुणे

Pune : ओतूर पोलीसांनी शेती मोटारीच्या केबल चोरांच्या मुसक्या आवळल्या

पराग जगताप

ओतूर : ओतूर ता.जुन्नर येथील पोलीसांनी रात्रीच्या नाकाबंदी दरम्यान शेती पंपाच्या केबल चोरणाऱ्या दोन चोरांना मुद्देमालासह पकडे असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.

सदर चोरांना रविवारी पहाटे नगर-कल्याण महामार्गावर गायमुखवाडी गावच्या हद्दीत पोलीस पथकाने पाठलाग करून पकडले. विजय शिवाजी बर्डे, वय २८, रा.सोमतवाडी, ता.जुन्नर, जि. पुणे व कृष्णा गोकुळ पवार रा.कुंदेवाडी,सिन्नर,

जि.नाशिक असे अटक केलेल्या आरोपीची नावे असून त्यांच्या कडून अंदाजे १,८०,००० किंमतीच्या १२०० मीटर केबल व एक टि.व्ही.एस.कंपनीची रायडर मॉडेलची मोटार सायकल नं.एम एच १५जे जी ४९९२ जप्त करण्यात आली आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की ओतुर पोलीसांकडून खामुंडी पासुन बदगी घाटाकडे जाणारे रोडवर तसेच पिंपरी पेंढार पासुन म्हसवंडी घाटाकडे जाणारे रोडवर पोलीस नाकाबंदी व रात्रगस्त चेकींग करण्यात येत होती.

रविवारी पहाटे ०३.४५ वा. चे सुमारास उंब्रज गावाकडुन खामुंडी गावाकडे आलेल्या एका मोटार सायकलवरील दोन इसम हे एका पांढरे रंगाचे बारदान गोणमध्ये काहीतरी घेवुन जात असल्याचा संशय आल्याने त्यांना पोलीसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते न थांबता मोटार सायकलसह पिंपरी पेंढार बाजुकडे निघुन गेले.

पोलीसांच्या रात्रीच्या गस्त पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना गायमुखवाडी परिसरात ओढ्याजवळ पकडुन त्याचे ताब्यातील पांढरे गोणची पाहणी केली असता त्या गोणीमध्ये शेतीच्या मोटारीच्या केबल आढळुन आल्या.

त्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलीसी हिसका दाखवून सखोल विचारपुस केल्यावर त्यांनी उंब्रज नं. १ गावचे हद्दित दांगटपट,बंगलावस्ती परिसरात येडगाव धरणाचे पाणी साठ्याचे ठिकाणावरील शेतक-यांचे शेतीच्या मोटारीची केबल चोरून घेवुन जात असल्याची कबुली दिली.

याबाबत खात्री केली असता या परीसराती विलास दगडु कुटे, सुदर्शन दत्तात्रय काकडे, उमेश माधव दांगट, बबन विठ्ठल हांडे,किसन मगन दुरगुडे, रामदास गणपत वेठेकर, विठ्ठल सोपान दुरगुडे या सर्व शेतकरी यांचे उंब्रज नं. १

गावचे हद्दित येडगाव धरणाचे पाणी साठ्यात बसविलेले शेतीच्या पाण्यासाठी बसवलेल्या विजेच्या मोटारींच्या सुमारे १,८०,००० रू.किंमतीच्या १२०० मीटर लांबीच्या केबल चोरीस गेले असल्याचे निष्पण्ण झाले आहे. ती आरोपी विजय शिवाजी बर्डे व कृष्णा गोकुळ पवार यांस कडून हस्तगत करण्यात आली.याबाबत ओतूर पोलिसात विलास दगडु कुटे, रा. गायमुखवाडी यांनी फिर्याद दिली आहे.

सदर कारवाई पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक

अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे,जुन्नरचे उपविभागिय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस हवालदार एम. एस. राठोड, पोलीस नाईक एस.डी.गेंगजे, डी.आर. पालवे, एस.आर.लांडे, एन.सी.तडवी यांनी व होमगार्ड आणि पोलीस मित्रा यांनी मिळून केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Singapore Airlines: लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू, तर अनेक जण जखमी

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी सपाट बंद; निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक प्रथमच 52,000च्या वर, कोणते शेअर्स चमकले?

Brij Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहचा पाय खोलात! कोर्टानं ७ विविध कलमांतर्गत केली आरोप निश्चिती

Blackout Teaser Out: "वक्त बदलने वाला है!"; '12 वी फेल' फेम विक्रांतच्या 'ब्लॅकआऊट'चा जबरदस्त टीझर रिलीज

HSC Result : पत्रकार व्हायचंय? 12वी नंतर काय कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT