Pune Rave Party Court Hearing ESakal
पुणे

Pune Rave Party: आरोपींव्यतिरिक्त अन्य तीन व्यक्ती हॉटेल परिसरात येऊन...; कोर्टात पोलिसांचा खळबळजनक दावा

Pune Rave Party Court Hearing: पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर यांच्यासह अन्य सहा आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठा दावा केला आहे.

Vrushal Karmarkar

रविवारी पहाटे पुण्यातील खराडी येथील पॉश परिसरात एक रेव्ह पार्टी झाली आहे. रेव्ह पार्टीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक केली. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज, हुक्का आणि दारू जप्त करताना एकूण ७ जणांना अटक केली आहे. यानंतर आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनवली आहे. यात पोलिसांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

कोर्टात पोलिसांनी सांगितले की, दाखल गुन्ह्यातील आरोपीकडून एकूण ४१,३५,४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये कोकेन, गांजा, एकुन १० मोबाईल, दोन चारचाकी वाहने, हुक्कापॉट आणि दारूच्या बॉटल असा इतर अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहे. दाखल गुन्ह्यातील आरोपींचे ताब्यातून जप्त केलेला ७० ग्रॅम गाजा आणि २ ग्रॅम ७ मिलीग्रॅम कोकेन या अंमली पदार्थाचे प्रमाण हे मध्यम आहे.

हे अंमली पदार्थ कुठून आणले? कुणी विक्री केली? याबाबत तपास करणे आहे. आरोपींची स्टेबर्ड हॉस्पीटयालीटी या मध्ये दि.२५/०७/२०२५ ते दि.२८/०७/२०२५ रोजी वा काळासाठी एकूण तीन रूम बुक केलेल्या आहेत. या अनुशंगाने आरोपीतांकडे अधिक तपास करावयाचा आहे. हॉटेलच्या आवारातून तीन व्यक्ती येऊन गेल्याची प्राथमिक माहिती तपासादरम्यान मिळाली आहे. त्यांचा शोध घेऊन गुन्ह्याच्या अनुशंगाने विचारपूस करायची आहे, असं पोलीस म्हणाले.

त्यांनी सांगितले की, आरोपी क्रमांक १ प्रांजल खेवलकर आणि आरोपी क्रमांक ५ श्रीपाद यादव हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत. दाखल गुन्ह्यातील मुख्य सुत्रधाराचा शोध घेणे आहे. त्याकरीता आरोपींची कस्टोडीयल एंन्ट्रोगेशनची आवश्यकता आहे. दाखल गुन्ह्यातील अटक आरोपींकडून जप्त केलेला गांजा आणि कोकेन हे अवैद्य व्यवसायाकरीता संगनमताने टोळी निर्माण केली आहे काय? याबाबत तपास करणे आहे.

दाखल गुन्ह्यातील अटक आरोपीनी संगनमताने विक्री करीता आणलेले अंमली पदार्थ त्यांनी कोणाकडून आणला आहे? कोणास विक्री करणार होते, साठा कोठे करून ठेवलेला आहे का? त्यांचे आणखी कोणकोण साथीदार आहेत. याबाबत आरोपींना विश्वासात घेऊन तपास करणे आहे. दाखल गुन्ह्यातील आरोपींना अंमली पदार्थाच्या गैरव्यवहारातून मिळालेल्या पैशातून मालमत्ता जमा केली आहे काय? याबाबत त्यांना विश्वासात घेऊन तपास करायचा आहे, असं पोलीस म्हणाले आहेत.

दाखल गुन्ह्यातील आरोपीचे अंमलीपदार्थ तस्करीचे आंतर राज्य टोळीशी काय संबंध काय आहे? याबाबत तपास करायचा आहे. आरोपीचे गुन्हेगारी रेकार्ड पडताळून त्याच्याकडे तपास करणे आहे. आरोपींना सदर अवैध व्यवसायासाठी कोण पैसे पुरवित आहे का याबाबत तपास करणे आहे. ऐनवेळी उपस्थित मुद्यावर तपास करायचा आहे, पोलीस कोठडी मागण्याआधी पोलिसांनी ही कारणे न्यायालयात मांडली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 4th Test : टीम इंडिया लढली, भडली अन् मँचेस्टर कसोटीही वाचवली! गिलपाठोपाठ जडेजा, वॉशिंग्टनचीही शतकं

Crime News: भाजप नेत्याचा मुलाला ड्रग्जसह अटक! युवतीसोबत पळून जाताना थांबवले तर पोलिसांच्या अंगावर घातली गाडी

Dhananjay Munde: ...तर त्याला फाशी द्या, धनंजय मुंडे यांचे वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

ENG vs IND 4th Test: जडेजाने इतिहास घडवला! गॅरी सोबर्स यांचा ५९ वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी; लक्ष्मणच्याही पंक्तीत स्थान

Uddhav Thackeray: पुढचा काळ नक्कीच चांगला! राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचं भावनिक विधान; म्हणाले...

SCROLL FOR NEXT