yavat
yavat 
पुणे

पोलिस शिपाई तात्या कऱ्हेने यवतचे मैदान गाजवले

सकाळवृत्तसेवा

यवत - यवत पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई तात्या कऱ्हे व स्थानिक मल्ल राष्ट्रीय खेळाडू मंगेश दोरगे व प्रदिप कोडीतकर यांनी केलेल्या चितपट कुस्त्यांनी यवतच्या आखाड्याला मोठी रंगत आली. बहुतांश कुस्त्या चितपट झाल्या असल्या तरी आपल्यापेक्षा वरचढ मल्लांना आस्मान दाखवल्याने उपस्थीतांमध्ये या तिघांची चांगलीच चर्चा रंगली.

यवत येथे दरवर्षी जंगी आखाडा भरतो. पुणे, कोल्हापूर येथे तालीम करणाऱ्या स्थानिक मल्लांसोबतच पंजाब, हरयाणासारख्या परप्रांतातून व राज्याच्या विविध जिल्ह्यातून येथे मल्ल येत असतात. समाधानकारक इनाम मिळत असल्याने येथे मल्लांची मोठी गर्दी असते. शेवटच्या कुस्तीचे इनाम हे या आखाड्याचे एक वैशिष्ट आहे. वर्षगणीक वाढणारा हा आकडा या वर्षी एक लाख एकतीस हजार रूपयांवर गेला होता. जुबेर पिरजादे व गोरख पवार ही मानाच्या कुस्तीगटातील कुस्ती बरोबरीत सुटली असली तरी आखाड्यात गाळलेला घाम आणि त्यांनी केलेल्या डाव प्रतिडावाने लोकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. 

आखेरच्या मानाच्या सात कुस्त्यांमध्ये जुबेर पिरजादे विरूद्ध गोरख पवार, मंगेश दोरगे विरूद्ध विजय कोकरे, शंकर माने विरूद्ध ऋषिकेश भांडे, अनिल ब्राम्हणे विरूद्ध प्रताप हेगडे, सागर मोहोळ विरूद्ध नागेश माने, तुषार डूबे विरूद्ध अक्षय गरूड आणि शेवटी सागर बिराजदार विरूद्ध शिवराज राक्षे यांचा समावेश होता. कुस्ती समालोचक प्रशांत भागवत यांच्या समालोचनामुळे कुस्त्यांचा खरा आनंद उपस्थीतांना घेता आला. सदानंद दोरगे, श्रीपती दोरगे, सतीश दोरगे, बबन दोरगे, दत्तात्रय दोरगे, शंकर दोरगे यांनी पच म्हणून काम पाहिले.
 
शेवटचा मान तीघांना
य़वतच्या आखाड्यात नामांकीतांची संख्या मोठी असते. त्यामुळे अखेरच्या काही कुस्त्याना मानाच्या कुस्त्या म्हणन्याचा प्रघात पडला आहे. शेवटच्या तीन कुस्त्या अशा मानाने झालेली ही सुरूवात आता सातवर पोहोचली आहे. या वर्षी मात्र जाहीर होऊनही सागर बिराजदार आखाड्यात न आल्याने तुषार डुबे आणि अक्षय गरूड यांच्या कुस्तीला शेवटचा मान देऊन शिवराज राक्षेसह तो तिघांमध्ये वाटून देण्यात आला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT