पुणे

...मग 100 नंबरचा उपयोग कशासाठी?

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी (पुणे) : तातडीच्या मदतीसाठी तुम्ही कुठे फोन कराल? 100 क्रमांकावरच ना. पण, तब्बल 35 वेळा फोन करूनही उचलला जात नसेल, प्रतिसाद मिळत नसल्यास काय करणार? थेट पोलिस ठाणेच गाठावे लागेल. असा अनुभव आल्यास दोष कुणाला देणार, पोलिस की टेलिफोन कंपनी? होय ही वस्तुस्थिती आहे. 100 क्रमांकाबाबत या दोन्ही घटकांना संवेदनशीलता नसल्याचे उघड झाले आहे. 

शनिवारी (ता. 9) दुपारी साडेबाराची वेळ. ठिकाण नाशिक फाटा. एक चिमुकली विद्यार्थिनी रस्त्यावर भेदरलेल्या अवस्थेत पायी जात होती. त्याचवेळी एका सजग नागरिकाने तिची विचारपूस केली. पोलिसांच्या मदतीसाठी 100 क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, तब्बल 35 वेळा फोन करूनही संपर्क होऊ शकला नाही. अखेर त्या नागरिकाने स्वतः मुलीला पोलिसांकडे आणले. तेथे विचारपूस केल्यानंतर त्या मुलीला पुन्हा पिंपळे गुरव येथे तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. अशा तातडीच्या वेळी मदत हवी असल्यास खरेच ती मिळू शकेल का, असा कटू अनुभव त्या नागरिकाला आला. या घटनेवरून टेलिफोन कंपन्यांसह पोलिसांनाही 100 क्रमांकाचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. 

जिवाला धोका आहे, चोरी झाली, भांडणे झाली अथवा अन्य अडचण असल्यास पोलिसांकडून मदत मिळण्याच्या प्रत्येक व्यक्ती मदतीच्या अपेक्षेने 100 क्रमांक डायल करतो. त्यावर नियंत्रण कक्षात कॉल येतो. मग मिळालेली माहिती वॉकीटॉकीवर पाठविली जाते. त्यानुसार मदतीसाठी फोन केलेली व्यक्ती ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणच्या पोलिस ठाण्यासह गस्तीवरील कर्मचारी तातडीने घटनास्थळी पाठविले जातात. अशावेळी मदत मिळाल्यास होणारा अनर्थ टळू शकतो. मात्र, कॉलच लागत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. यात पोलिसांकडून काहीही पावले उचलली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. 

आढाव्याबाबत उदासीनता 
या क्रमांकावर फोन लागत नाही, अशी तक्रार आल्यानंतर पोलिस प्रशासनाला जाग येते. मात्र, वेळोवेळी याबाबतचा आढावा घेण्याबाबत उदासीनता दाखविली जाते. तातडीच्या मदतीअभावी एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

आमच्याकडील यंत्रणेत कोणताही दोष नाही. टेलिकॉम कंपन्यांपैकी वोडाफोन, आयडिया या कंपनीच्या क्रमांकावरून फोन लावल्यास अडचण निर्माण होत आहे. याबाबत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविले आहे. 
- शिरीष जाधव, पोलिस निरीक्षक, वायरलेस विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईने जिंकली नाणेफेक! जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेइंग ११

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

'श..श...शशांक...', KKR विरुद्ध विजयानंतर पंजाबच्या पठ्ठ्यानं शाहरुखच्या स्टाईलमध्ये ईडन गार्डन्सचे मानले आभार, पाहा Video

Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT